सरकारकडून मराठा आंदोलकांची मुद्दाम हेळसांड
अकलूज,(कटूसत्य वृत्त):-
शौनालवानी सोब नाही. अंघोळीला पाणी नाही. आझाद मैदान परिसरातील सर्व हातगाडे, हॉटेल, टपऱ्या मुद्दाम बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे काहीही खायला मिळत नाही, असे करून सरकार मुद्दाम मराठा आंदोलनकर्त्यांची हेळसांड करत आहे. पण प्रतिकूल परिस्थितीशी लढणे हे मराठ्यांच्या रक्तातच आहे. विषय जेवढा गंभीर, मराठा तेवढाच खंबीर. आम्ही लढणार. सरकारच्या दडपशाहीला घावरून पळून जाणार नसल्याचे मराठा आंदोलनकर्ते, माळशिरस तालुका मराठा समन्वयक अण्णासाहेब शिंदे यांनी संचार प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
शिंदे म्हणाले, आम्ही मुंबईत दाखल झालो तेव्हा पाऊस सुरु होता. एक दिवस आणि एक रात्र आम्ही भिजत काढली आहे. आझाद मैदानावर चिखल झाल्यामुळे बसायलाही जागा उरली नवती उपब्यावर झोपावे लागल्यामुळे डासांनी फोडून काढले आहे. मैदानाच्या परिसरात सरकारकडून ५० ते ६० मोबाइल शौचालये ठेवण्यात आली आहेत. येथे हजारो लोक आले आहेत. या लोकांना ही शौचालये कशी पुरणार? त्यामुळे आंदोलनाला आलेल्यांची कुचंबणा होत आहे. मैदानाच्या परिसरातील सर्व हॉटेल्स कडकडीत बंद ठेवण्यात आल्यामुळे जेवणाची पंचाईत झाली आहे. ज्या लोकांनी काही दिवस पुरेल एवढे अन्न बरोबर आणले आहे, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अंघोळीसाठी एक टैंकर येतो. तो पुरत नाही. रेल्वे स्टेशनवरील हॉटेल चालू आहेत. पण तिथे तुडुंब गर्दी झाली आहे. सरकारने आंदोलनकर्त्यांना हैराण करण्यासाठी अशा प्रकारे दडपशाही सुरु केली आहे. असे शिंदे यांनी सांगितले.
बिगर अंघोळीचे राहू मिळेल ते अन्न खाऊन राहू प्रसंगी उपाशी राहू पण आता मागे हटणार नाही. त्रास देऊन आम्हाला पळवून लावण्याचा या सरकारचा डाव आमच्या लक्षात आला आहे. पण जे मराठे मोगलांच्या वेढ्याला घाबरले नाहीत ते या जुलमी सरकारला काय घावरणार? आम्हीही आता इरेला पेटलो आहोत.
उपासमारीने जीव गेला तरी हरकत नाही. पण आता आमचे नेते मनोज जरांगे यांचा आदेश होईपर्यंत मागे हटणार नाही, असा इरादा अण्णासाहेब शिंदे यांनी बोलून दाखवला.
0 Comments