पैसे भरून चार वर्षे लोटली, मोजणी नाही
सोलापूर :,(कटूसत्य वृत्त):-
शहरातील मजरेवाडी जुळे सोलापूर गंगाधर नगरात जागेची मोजणी करण्यासाठी रहिवाशांनी पैसे
भरून चार वर्षाचा कालावधी लोटला तरी देखील महापालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे बांधकाम करता येत नसल्याची तक्रार परिसरातील रहिवाशांनी सोमवारी आयुक्तांच्या जनता दरबारात केली.
दोन तीन आठवड्यापासून शांत असलेल्या जनता दरबारात महापालिका आयुक्तांनी हजेरी लावल्यामुळे सोमवारच्या जनता दरबारात तक्रारींचा मोठा पाऊस पडला. अनेक नागरिक तक्रार घेऊन प्रत्यक्ष य आयुक्तांची संवाद साधत होते. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंम्बासे जातीने लक्ष घालून
तक्रारीचे निवारण करत होते.
गंगाधर नगर, जुळे सोलापूर सब प्लॉट जागा मालक महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यामुळे डीपी रस्ता, ड्रेनेज लाइनमुळे बाधित झाले आहे. महापालिका आयुक्त्यांकडे वारंवार तक्रार केली. कब्जा पावती व उतारे मिळण्यासाठी मागणी करून देखील दखल नाही. तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडून शासकीय मोजणीसाठी रक्कम भरून घेतली आहे. लेआउटची मोजणी करून
घेतली आहे. याबाबतची तक्रार विलास करणकोट, रवींद्र गोफणे, राहुल पंपपटवार, अमोल गोवित्रीकर
यांनी सोमवारच्या जनता दरबारात मांडली. जुळे सोलापुरातील सिंधू विहार कॉलनी मध्ये पथदिवे
बसविण्याची मागणी जयश्री पोतदार यांनी केली. हब्बु वस्ती मधील धोकादायक पिंपळ झाड तोडण्याची
मागणी श्रीकांत साबळे यांनी केली आहे.
0 Comments