मंत्री, नेत्यांना धार्मिक कार्यापासून दूर ठेवावे
नितीन गडकरी : धर्मकारण हे सत्तेपासून दूर असावे
नागपूर (कटूसत्य वृत्त):-   राजकारणी जिथे जिथे प्रवेश करतात तिथे तिथे आग लावल्याशिवाय ते निघून जात नाहीत. जर धर्माला सत्ता दिली तर नुकसानच होईल, असे परखड मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
नागपूर येथे आयोजित महानुभव पंथीय संमेलनात त्यांनी पुन्हा एकदा राजकारण आणि धर्मकारण यांवर आपल्या खास शैलीत भाष्य केले. पंथ आणि संप्रदायांनी मंत्र्यांना दूर ठेवायला पाहिजे, धर्मकारण हे सत्तेपासून दूर असले पाहिजे. कारण राजा नाही तर धर्म श्रेष्ठ आहे, असे स्पष्ट विधान त्यांनी या प्रसंगी केले. पुढे बोलताना ते म्हणाले की धार्मिक कार्य, सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य वेगळे आहेत. धर्म हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे. काही राजकारणी त्याचा वापर करतात. त्यामुळे विकास आणि रोजगार हा विषय दुय्यम ठरतो. अशी थेट भूमिका गडकरी यांनी व्यक्त केली.
बोलणे सोपे आहे, करणे कठीण आहे. मी अधिकारी नाही, पण मला अनुभव आहे की मी ज्या क्षेत्रात काम करतो, तिथे मनापासून सत्य बोलण्यास मनाई आहे. राजकारणात असे लोक असतात जे उत्कटतेने, उत्साहाने आणि आनंदाने काम करतात. तथापि, जो लोकांना सर्वोत्तम मूर्ख बनवू शकतो तो सर्वोत्तम नेता असू शकतो.
तसेच, काहीतरी मिळवण्यासाठी एक शॉर्टकट असतो. जसे की लाल सिल तोडणे किंवा उड़ी मारणे. पण एका तत्वज्ञानीने म्हटले आहे की शॉर्टकट तुम्हाला कमी करतात, म्हणजेच शॉर्टकट घेऊन ध्येयापर्यंत लवकर पोहोचता येत नाही. त्यांच्या या विधानमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उपाण आले आहे.
गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी, धाडसी विधानांसाठी ओळखले जातात. अनेक ज्वलंत मुदयांवर ते परखडपणे आपले मत मांडत असतात. सध्या गडकरी यांनी केलेली विधाने चांगलीच चर्चेत आली आहेत.
0 Comments