उद्योग बँक- रोटरी एमआयडीसी
एआयमुळे कारकुनी कर्मचाऱ्यांवर येऊ शकते बेरोजगारीची वेळ
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान डिजिटल डेटावर आधारित माहिती देऊ शकते, मात्र नॉन-डिजिटल डेटावर काम करण्यात त्याला मर्यादा आहेत. एआय वापरून सुरू केलेल्या तब्बल ८० टक्के स्टार्टअप्स अयशस्वी झाले आहेत. तरीसुद्धा गेल्या काळात एआयमुळे सुमारे ९० टक्के कारकुनी कामे नष्ट होणार असून, त्यामुळे कारकून वर्गावर बेरोजगारीची वेळ येऊ शकते, असे मत पुण्याचे एआय अभ्यासक डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले.
सोमवारी, डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात उद्योग बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ व
रोटरी क्लब सोलापूर एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त आयोजित बौद्धिक व्याख्यानमालेत 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्वांसाठी या विषयावर पाचवे पुष्प गुंफताना डॉ. शिकारपूर बोलत होते. यावेळी व्याख्यानमाला समितीचे प्रेसिडेंट बल्लादास लचमापुरे, अध्यक्ष श्रीनिवास विंगी, रोटरी अध्यक्ष रमेश कमटम, सचिव काशीनाथ कुंटला, जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गडम, सुगश खानापुरे आदी उपस्थित होते.
डॉ. शिकारपूर म्हणाले, एआपला कितीही प्रश्न विचारा, तो कधी थकत नाही. मात्र, हेल्थ आणि शिक्षण क्षेत्रातील माहिती देताना एआय अपुरा पडतो. आपल्याकडे शिक्षक आणि डॉक्टर हेच अधिक सक्षम आहेत. त्यामुळे जेथे पर्याय उरत नाही, तेथेच एआयचा वापर करावा,
वक्त्यांचा परिचय बुचय्या गुंडेटी यांनी तर प्रा. विठ्ठल गंगा यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रा. विलास बेत, डॉ. ज्योती चिडगुपकर, श्रीनिवास इम, डॉ. संजय मंठाळे, प्राचार्य एस. बी. क्षीरसागर, तुकाराम शेवाळे, मोहन देशपांडे आदी उपस्थित होते.
0 Comments