Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर महानगरपालिका प्रारूप प्रभाग रचना उद्या जाहीर होणार

 सोलापूर महानगरपालिका प्रारूप प्रभाग रचना उद्या जाहीर होणार
 
मा. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक
2025 करीता तयार केलेली प्रारूप प्रभाग रचना सोलापूर महानगरपालिकेतील कौन्सिल हॉल येथे येथे दि. 03/09/2025 रोजी जाहीर / प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच संपूर्ण प्रारूप प्रभाग रचनाचे नकाशे सोलापूर महानगरपालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येत आहे. प्रसिध्द करण्यात येणाऱ्या प्रारुप प्रभाग रचनेवर दि. 03/09/2025 ते 15/09/2025 रोजी 3.00 वाजेपर्यंत सोलापूर महानगरपालिका, निवडणूक कार्यालय, डॉ. द्वारकानाथ कोटणीस हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सोलापूर येथे हरकती / सूचना स्विकारण्यात येतील.
Reactions

Post a Comment

0 Comments