सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे मुंबईत मराठ्यांवर उपासमारीची वेळ
*टेंभुर्णी येथून आंदोलकांसाठी 7000 भाकरी व इतर खाद्यपदार्थ घेऊन गाडी मुंबईकडे रवाना*
टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):- मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गरजवंत मराठयासाठी आरक्षण लढाईसाठी सुरू आहे. सरकारने घेतलेल्या आडमुठ्यापणामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या मराठा बांधवांचे खाण्यापिण्याची फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. सदर अडचण दूर करण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून माढा तालुक्यातून टेंभुर्णी येथे जमेल त्या प्रकारचे अन्न आणून द्यावे. असे आव्हान करण्यात करण्यात आली होते.
मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनावर सरकारने कठीण परिस्थिती निर्माण केली आहे. हॉटेल बंद केली आहेत. आपले बांधव त्या ठिकाणी अन्नपाण्या वाचून उपासमारीची वेळ आली आहे. तरी येतील सर्व बहुजन बांधव 18 पगड जाती, मराठा बांधव यांनी जेवढे शक्य होईल त्या भाकरी ठेचा व सुखा मेवा, बिस्कीट दिली. टेंभुर्णी येथून माढा तालुका मराठा समाज बांधवांच्या वतीने एकत्रित केलेले अन्न शिदोरी मुंबईकडे आज सायंकाळी रवाना झाली. यावेळी मराठी पानिपत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील लढाईसाठी गेले असता त्याही ठिकाणी अशाच पद्धतीने सैन्यांवर उपासमारीची वेळ येऊन अन्नपाण्यावाचून त्या ठिकाणी उपाशी मरावे लागले तशा पद्धतीचे उपासमारीची वेळ आपल्या मराठा बांधवांवरती येऊ नये म्हणून दादांच्या यशस्वी आंदोलनाला एक भाकरी देऊन सर्वांनी साथ देण्यासाठी टेंभुर्णी परिसरातील सापटणे टें, तांबवे टें, बेंबळे, शिराळ टें,चव्हाणवाडी टें, टाकळी टें, या गावातून 7000 भाकरी तसेच ठेचा पाणी बॉटल लोणचे फरसाण चिवडा व अकोले खुर्द येथील रोमन यांनी खास मुंबईसाठी 200 पाणी बॉटल चे बॉक्स दिले तसेच इतर खाद्य पदार्थ गोळा करून एक पिकप जीप भरून मुंबईकडे एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत पाठवण्यात आली याप्रसंगी सकल मराठा समाजाचे नेते व माजी सभापती बंडू नाना ढवळे मार्केट कमिटीचे संचालक दिलीपराव भोसले जनता राजा मित्र मंडळाचे सुधीर बापू महाडिक, तांबवे गावचे तंटामुक्त अध्यक्ष नागाभाऊ खटके, उद्योजक गोरख खटके सर, चव्हाणवाडी चे सरपंच हनुमंत चव्हाण, शिराळचे सरपंच राजेंद्र ढेकणे, दादासाहेब पिसाळ सर, चव्हाणवाडी चे माजी सरपंच नवनाथ शिंदे , चव्हाणवाडी चे ॲड सचिन चव्हाण, शिवशंकर हॉटेलचे मालक बाळासाहेब चव्हाण, सचिन पवार अधिक जण उपस्थित होते
भाकरी, पाण्याचे बॉक्स, बिस्कीटचे बॉक्स वैष्णवी हॉटेल , कुर्डुवाडी रोड टेंभुर्णी येथे एकत्रीत करून मुंबईकडे पाठविण्यात आली. मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे. त्यामुळे मराठा बांधवांना अन्नपाण्याची सोय करण्यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे असे आवाहन बंडू नाना ढवळे यांनी समाजातर्फे करण्यात केलें आहे
0 Comments