ईद-ए-मिलाद निमित्त सनराईज क्लब च्या वतीने रक्तदान शिबिर १२१ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- रक्ततदान शिबिरासारखा आरोग्यदायी उपक्रम राबवून अनेकांचे जीव वाचवण्यासाठी हातभार लावुन आजच्या युगात रक्त हा घटक आरोग्यासाठी अत्यंत अत्यावश्यक गरज बनला असून अनावश्यक खर्च टाळून रक्तदान शिबिर घेणे ही काळाची गरज आहे. सनराईज क्लबच्या या जीवनदायी उपक्रमाचा आदर्श सर्व स्तरातील घटकांनी घेणे आवश्यक आहे. असे आवाहन मोहोळचे ज्येष्ठ नेते शहाजहान शेख यांनी केले.
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मोहोळ येथील सनराइज् क्लबच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उदघाटना नंतर उपस्थितांना आवाहन करताना शेख बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील उपस्थित होते.यावेळी नगरसेवक मुस्ताक शेख, नगरसेवक दत्तात्रय खवळे, प्रमोदबापू डोके, पो.गजानन माळी, जिब्राईल शेख उपस्थित होते.
यशस्वीर यशस्वी करण्यासाठी हुजेफ शेख, अजीम तांबोळी, साकिब आतार, शाहीद शेख, शायद शेख, जावेद बागवान, साकिब शेख, अबीद शेख, जैद शेख, इंजमाम शिकलकर, हरिष शेख, साकिब शेख, सुफियान शिकलकर, इत्यादी सनराइज क्लबच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल १२१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला यावेळी सूत्रसंचालन सादिक आता यांनी तर आभार मुस्ताक शेख यांनी व्यक्त केले.
चौकट
रक्तदान हेच श्रेष्ठ दान आणि सद्यः स्थिति मध्ये असलेला अपुरा रक्तसाठा याचा विचार करून ईद-ए-मिलाद निमित्त सनराइज क्लब परिवाराच्या वतीने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यापूर्वी देखील सनराइज् क्लबच्या वतीने विविध समाजपयोगी कार्यक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. या पुढील काळातही असेच उपक्रम राबवून सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी आम्ही आणि आमचा सनराइज क्लब वचनबद्ध आहोत.
0 Comments