शिवप्रसाद फाउंडेशनच्या वतीने दहिगाव गटातील नागरिकांना रेशन कार्ड वाटप
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- शिवप्रसाद फाउंडेशनच्या माध्यमातून दहिगाव तालुका माळशिरस येथे रेशन कार्ड ऑनलाइन करून देणे बाबत शिबिर घेण्यात आले. या शिबिरात नवीन रेशन कार्ड काढणे, दुय्यम रेशन कार्ड काढणे, रेशन कार्ड मधून नाव वेगळे करून नवीन कार्ड देणे, रेशन कार्ड मधून नाव कमी करणे, रेशन कार्ड मध्ये नवीन नाव समाविष्ट करणे इत्यादी सेवा देण्यात आल्या. या शिबिरामध्ये दहिगाव गटातील शेकडो नागरिकांनी या शिबिरात सहभाग नोंदवून रेशन कार्ड संदर्भातील प्रलंबित असलेली आपले काम पूर्ण पूर्ण करून घेत शिबिरा बाबत दहिगाव गटातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मा.जि.प. सदस्या ऋतुजाताई शरद मोरे यांच्या हस्ते शिबिरामधील लाभार्थ्यांना रेशन कार्ड वाटप केले.यावेळी वैभव मोरे, गणेश टेंबरे, धनाजी खुसपे, विजय सरवदे, रोहन कोरटकर उपस्थित होते.
0 Comments