आघामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची अकलूज येथे बैठक
नातेपुते (कटूसत्य वृत्त):-इच्छुक उमेदवारांनी तयारी लागा असे सुचना सतीश सपकाळ यांनी दिल्या उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते ना.एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार उपनेते माजी आमदार ॲड शहाजी पाटील, संर्पक प्रमुख महेश साठे, जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील मौजे अकलूज येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी संर्पक प्रमुख महेश साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांचे अध्यतेखाली शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक पार पडली. दरम्यान विविध विषयांवर चर्चा करत असताना आगामी पुढील होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकांबाबत त्या ठिकाणी चर्चा विनिमय करून इच्छुकांनी तयारीला लागा अशा सूचना देण्यात आल्या. तसेच सदर बैठकीत शिवसेना माळशिरस तालुका यांच्या वतीने लवकरच रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने तालुक्यातील बेरोजगार तरुणांना तसेच महिलांच्या हाताला काम करण्याची मोठी संधी शिवसेना उपलब्ध करून देणार आहे. तसेच लघुउद्योगांसाठी सहकार्य या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची देखील चर्चा या बैठकीत करण्यात आली, तसेच माळशिरस तालुक्यातील शेकडो महिलांना शिलाई मशीनचे देखील वाटप करण्यात येणार असल्याची माहिती तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांनी दिली.
या बैठकीसाठी माळशिरस तालुका शिवसेना नेते एकनाथ कर्चे, शिवसेना ओबीसी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष भीमराव भुसणर, जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे, जिल्हा उपप्रमुख दीपक खंडागळे, तालुका कार्यप्रमुख महादेव तुपसौंदर, तालुका उपप्रमुख सुनील साठे,रणजीत गायकवाड ,तालुका प्रवक्ते प्रा शहाजी पारसे,ॲड योगेश लोखंडे, अकलूज शहर प्रमुख महेश पवार,रावसाहेब कोकाटे,सह तालुक्यातील शिवसैनिक व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments