पंढरपूरच्या एमआयटी ज्युनिअर कॉलेजचा टेबल टेनिसमध्ये डंका
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत वाखरी, पंढरपूर येथील एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या 19 वर्षांखालील संघाने तृतीय क्रमांक पटकावून यश संपादित केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत पारस शेठ, राजवीर कुलकर्णी, अथर्व चव्हाण, पार्श्व देशमाने आणि जय पाटील या विद्यार्थ्यांनी एमआयटी ज्यूनिअर कॉलेजच्या वतीने स्पर्धेत सहभागी होत हे यश मिळवले. सर्व यशस्वी खेळाडूंचे हेड मिस्ट्रेस शिबानी बॅनर्जी, प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ, क्रीडा शिक्षक प्रवीण पिसाळ व संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच पुढील स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या यशाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला असून, पुढील स्पर्धांसाठी अधिक तयारी करून चमकदार कामगिरी करण्याचा निर्धार केला आहे.
0 Comments