भारताच्या लोकशाहीवर गदा आणणारा जनसुरक्षा कायदा रद्द करा : शटगार
नंदेश्वर (कटुसत्य वृत्त):- जनसुरक्षा कायदा २०२४ या कायद्यानुसार एखादी संघटना किंवा व्यक्तीला बेकायदा ठरविता येणार आहे. यामुळे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मुलभूत अधिकारांवर गदा येईल. विधेयकातील अस्पष्ट तरतुदींमुळे नागरिक स्वतःहूनच बंधने घालून घेण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या तरतुतींमुळे निरपराध नागरिकांना कोणत्याही इशाऱ्याशिवाय शिक्षा होऊ शकते.
अशाप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा जनसुरक्षा कायदा २०२४ हा कसल्याही परिस्थितीत रद्द झाला पाहिजे असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी केले.
महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक २०२४ रद्द करण्यासंदर्भात १० सप्टेंबर रोजी मंगळवेढा प्रांताधिकारी बी. आर. माळी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, प्रदेश सचिव अॅड. रविकिरण कोळेकर, मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत साळे, पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघ अध्यक्ष मारुती वाकडे, अर्जुन पाटील, शहराध्यक्ष राहुल घुले हे उपस्थित होते. निवेदन देण्यापूर्वी महात्मा गांधी यांचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी सरकारच्या
विरोधात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष प्रशांत साळे म्हणाले, जन सुरक्षा कायदा म्हणजे लोकांची दिशाभूल आहे. नाव जनसुरक्षा दिलं आहे परंतु हा कायदा प्रत्यक्षात लोकांच्या विरोधातला कायदा आहे. नेहरू गांधींच्या विचारांचाची देशाला गरज आहे म्हणून आपण सर्वांनी या कायद्याला विरोध केला पाहिजे.
यावेळी अभिमन्यू बेदरे, पांडुरंग माळी, ज्ञानेश्वर कोंडुभैरी, समीर इनामदार, प्रवीण भोसले, आयेशा शेख, आबा पाटील, मनोज माळी, संदीप फडतरे, सत्तार इनामदार, ज्ञानेश्वर सोरडीकर, राजन ठेंगील, प्रदीप घुले, गणेश धोत्रे, बापू खराडे, नाथा आयवळे, सुनिता अवघडे, लक्ष्मण अवघडे, बापू अवघडे आदी उपस्थित होते.
0 Comments