Hot Posts

6/recent/ticker-posts

खराब रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करा युवक काँग्रेस मागणी

 खराब रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करा युवक काँग्रेस मागणी



पंढरपूर- (कटूसत्य वृत्त):-  पंढरपूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व अर्बन बँक ते कॉटेज हॉस्पीटल जाणारा रस्ता या अत्यंत आवश्यक असणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. तसेच अर्बन बँक ते एस.टी. स्टॅन्डकडे जाणारा रस्ता व शहरातील सर्व रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. नागरिकांना व शहरात येणा-या भाविकांना या रस्त्यांवर असलेल्या खड्डयामुळे ये जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
मागील तीन महिन्यापुर्वी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन

 देण्यात आले होते. त्यावेळेस मुख्याधिकारी यांनी लवकरात लवकर रस्ते दुरूस्त करून घेतो असे आश्वासन दिले होते. परंतु आषाढी यात्रेच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी येवुन सुध्दा रस्त्याची कामे निकृष्ठ दर्जाची करण्यात आली.तरी शहरातील रस्त्यांची दुरूस्ती लवकरात लवकर करण्यात यावी तसेच रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा  युवक काँग्रेस आय पंढरपूरचे शहराध्यक्ष संदिप शिंदे यांनी मुख्याधिकारी पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी  पंढरपूर तालुकाध्यक्ष संदिप पाटील , पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर सुर्यवंशी, सेवा दल शहराध्यक्ष गणेश माने, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष सोमनाथ आरे , युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रवि अग्रवाल, संग्राम मुळे, अक्षय वनसाळे , सामाजिक कार्यकर्ते मारूती धोत्रे, काँग्रेस सोशल मिडीया शहराध्यक्ष महेश अधटराव, राजाभाऊ सुरवसे, आण्णा पवार, अजित जगताप, रोहित सरवदे आदि उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments