देशभरात आजपासून जीएसटीचे नवी कररचना
नवी दिल्ली (वृत्त सेवा):- देशभरात जीएसटीची नवी कर रचना लागू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संध्याकाळी पाच वाजता संपूर्ण देशाला संबोधित केलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी आजपासून म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जीएसटीची नवी कररचान लागू होणार असल्याची माहिती दिली.
आता केवळ 5 आणि 18 टक्के एसटी लागू राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. या नव्या कर रचनेमुळे देशातील नागरिकांची मोठी बचत होणार आहे. अनेक जीवनाश्यक वस्तूंवर आता जीएसटी लागणार नाही. तर काहींवर केवळ 5 टक्के जीएसटी लागणार आहे. त्यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. उद्यापासून नेमक्या कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत, याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जीएसटीच्या नव्या कर रचनेनुसार, टुथपेस्ट, साबन आणि शॅम्प्यू स्वस्त होणार आहे. या वस्तूंवर आधी 12 टक्के जीएसटी लागायचा. आता केवळ 5 टक्के जीएसटी लागणार आहे.
नव्या जीएसटी रचनेनुसार, पॅकेज फुड्स जसे की बिस्किट, स्नॅक्स आणि जूस स्वस्त होणार आहेत. या वस्तूंवर आता केवळ 5 टक्के कर लागणार आहे. तसेच डेअरी उत्पादक तूप आणि कंडेंस्ड मिल्क स्वस्त होणार आहे. याशिवाय सायकल, स्टेशनरी वस्तूदेखील स्वस्त होणार आहेत. तसेच निश्चित किंमतीपर्यतचे कपडे आणि बूट स्वस्त होणार आहेत.
0 Comments