दयानंद महाविद्यालयाचे आरडीसी कॅम्पमध्ये सुयश
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दयानंद महाविद्यालयातील तीन एनसीसी छात्रांची २६ जानेवारी २०२६ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सराव संचलनासाठी निवड झाली आहे.
एनसीसी ग्रुप हेडकॉटर, पुणे येथे झालेल्या आंतरविभागीय आरडीसी शिबिरामधून आदित्य कांबळे (दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय),संस्कृती कोरे व हिना बागवान (दयानंद वाणिज महाविद्यालय) या विद्यार्थ्यांची राज्य व दिल्लीच्या सराव संचालनासाठी निवड विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ३८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या ५३ विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभाग घेतले. एनसीसी छात्रांनी सांस्कृतिक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, गार्ड ऑफ ऑनरच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक, पी एम रॅलीच्या मार्चिंग कंटीजंट स्पर्धेत द्वितीय क्रमांक असे तीन बक्षीस जिंकले.या शिबिरात पुणे विभागाच्या नऊ बटालियनमधून ३९० एनसीसी छात्रांनी सहभाग घेतले होते. एनसीसीचे पुणे मुख्य विभागाचे ब्रिगेडियर अर्जुन मित्रा यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवसांच्या आर डी सी कॅम्पमध्ये छात्रांनी कडक शिस्तीत व अथक परिश्रमाने एनसीसी शिबिर पुर्ण केले.या शिबिरामध्ये कर्नल एम.डी. मुत्तप्पा, कर्नल देवानंद मठपती,कॅप्टन भीमाशंकर व्हनमाने, सुभेदार मेजर अरुण ठाकूर, हवालदार योगेश चांदोरे , हवालदार रोशन इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले. आज दयानंद शिक्षण संस्थेत या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक सोहळा पार पडला.स्थानिक सचिव डॉ.महेश चोप्रा म्हणाले, आर्मी, नेव्ही, एअर फोर्समध्ये मुलींनी ऑफिसर होण्यासाठी एनडीए मधून यशस्वी प्रयत्न करावेत. आजचे मुली कमकुवत व दुबळा नसून सक्षम, प्रतिभावंत व शक्तिशाली आहेत. हे सांगताना ऑपरेशन शिंदूर मधील कर्तबगार महिला सैनिकांचे ज्वलंत उदाहरण दिले.. मुलाबरोबर मुली सुद्धा धाडसीने, शौर्याने व कुशलतेने कार्य करून समाज सेवेत, देशसेवेत आपला सहभाग नोंदवत आहेत ही अभिमानास्पद गोष्ट आहे. यावेळी दयानंद संस्थेचे प्रशासक डॉ. विजयकुमार उबाळे ,प्राचार्य डॉ.बी.एच. दामजी,प्राचार्य डॉ. एस. बी. क्षिरसागर, प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे आदींनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन भीमाशंकर व्हनमाने यांनी केले तर डॉ.आप्पासाहेब तेली यांनी आभार मानले.
0 Comments