प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साठ हजार वह्यांचे वाटप
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्याचे माजी विधानपरिषद आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या औचित्याने पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक गणेशभाऊ अधटराव व नवशक्ती सामाजिक संघटना सह्याद्री नगर इसबावी यांच्या वतीने पंढरपूर शहरातील सर्व शाळांमधिल शालेय विद्यार्थ्यांसाठी साठ हजार वह्यांचे वाटप करण्यात आले प्रशांतराव परिचारक यांच्या सामाजिक उपक्रमांवर भर देण्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत प्रतिवर्षी गणेशभाऊ अधटराव हे परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे या अगोदरही दिसून आले आहे त्यांनी या अगोदरही नवशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून परिचारक यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने वृक्षारोपण...आरोग्य व रक्तदान शिबिर असेल गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप महिलांसाठीचे गृहउपोयोगी वस्तुंच्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन असे आधी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत स्वतः प्रशांतराव परिचारक यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या हितचिंतकांनी वायफळ खर्च न करता समाज हितोपयोगी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले होते त्या पार्श्वभूमीवर गणेशभाऊ अधटराव यांच्या वतीने साठ हजार वह्यांचे वाटप पंढरपूर शहरातील सर्व शाळांमध्ये करण्यात आले
0 Comments