विद्यालयातील मुला-मुलींनी स्वच्छतेला प्राधान्य देऊन आरोग्याची काळजी घेणे गरजेचे
-चंद्रकांत पाटील
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छतेबाबत आग्रही आहेत. त्यांनी नेहमी स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. विद्यालयातील मुला-मुलींनीही स्वच्छतेला प्राधान्य देऊन आरोग्याची निगा राखणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सोनमाता आदर्श विद्यालय येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय केगांव यांच्या वतीने मोफत दंत व मौखिक तपासणी आणि सवलतीत उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी आई प्रतिष्ठानच्या संचालिका कु. सृष्टी डांगरे, श्रीमती रोहिणी तडवळकर, संस्था सचिव श्रीमती कीर्तीलक्ष्मी अत्रे, मोहन डांगरे, विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यालयातील मुले-मुलीं आदि उपस्थित होते.
पाटील यावेळी म्हणाले, विद्यालयीन मुलींना सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच मुलींना मोफत शिक्षण देत असून आवश्यक सुविधा देण्याचाही प्रयत्न करीत आहे. शासन विकासात्मक कार्याला निधी उपलब्ध करुन देत आहे. तसेच सर्व क्षेत्रातील लोकांनी, ट्रस्ट व संस्थांनी आपल्या उत्पन्नाचा काही हिस्सा सामाजिक कार्यासाठी दिला पाहिजे. यातून विकासात्मक कार्याला हातभार लागून राज्याचा विकास होणार आहे.
शिबीराच्या समारोप प्रसंगी मुला-मुलींना भेटवस्तू वाटप मंत्रीमहोदयांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पटेल यांनी केले.

0 Comments