जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला
"अकलूज पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल"
अकलूज (कटूसत्य वृत्त):- सध्या बावडा तालुका इंदापूर येथे रहात असलेल्या, फिर्यादी महिलेस दमदाटी, शिवीगाळ व तिची इच्छा नसताना,अकलूज येथील विविध परिसरात तिचे कडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतल्यामुळे, सदर महिलेने अकलूज पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार,
अकलूज पोलीस ठाणे गु.२.नं.662/2025 बी.एन.एस कलम 143(3),144(2),115(2),352,351( 2) 3(5) वगैरे सह अ.व्या.प्र.का.4.5 प्रमाणे,
सध्या बावडा ता. इंदापूर, जि.पुणे तर मुळ रा. आवाटी, ता. करमाळा, जि. सोलापूर येथील महिलेने दिलेल्या फिर्यादी नुसार,
आरोपी संगिता नाथा खरात, प्रतिक नाथा खरात,अक्षय देवकाते, भाऊ उत्तम कांबळे सर्व रा. बावडा
ता.इंदापुर जि. पुणे,
अंदाजे जानेवारी 2024 पासुन ते दिनांक 19/09/2025 रोजीचे दरम्यान वेळोवेळी अकलाई हॉस्पिटलच्या परिसरात तसेच काव्या लाईफस्टाईल कापड दुकानासमोर रोडवर व सुरज लॉज अकलुज ता. माळशिरस येथे महिलेची इच्छा नसतानाही तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला आहे.
याची सविस्तर हकिकत अशी की, वरील तारखेस आरोपी संगिता नाथा खरात, प्रतिक नाथा खरात, अक्षय देवकाते, भाऊ उत्तम कांबळे सर्व रा. बावडा ता.इंदापुर जि. पुणे यांनी फिर्यादीस मारहाण व उपासमार करुन, धमकी देऊन शिवीगाळ, दमदाटी करून फिर्यादीची इच्छा नसताना तिचेकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला आहे अशी तक्रार आलेने पोनि यांचे आदेशाने, गुन्हा रजिस्टरी दाखल करून,गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट न्यायालयात पाठविण्याची तजवीज ठेवली असुन, गुन्ह्याचा पुढील तपास मपोसई वणवे स्वतः करीत आहेत.
0 Comments