Hot Posts

6/recent/ticker-posts

सीना नदीकाठच्या गावकऱ्यांनी सतर्क राहावे – खासदार प्रणिती शिंदे यांचे आवाहन

 सीना नदीकाठच्या गावकऱ्यांनी सतर्क राहावे – खासदार प्रणिती शिंदे यांचे आवाहन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूरमधील राजूर, बिरनाळ व होणमुर्गी गावांना भेट देऊन खा. प्रणिती शिंदे यांचे आश्वासन, पूरग्रस्त स्थलांतरित नागरिकांसाठी अन्न-पाणी, आरोग्य सेवा आणि जनावरांसाठी चारा तातडीने उपलब्ध करून देणार.

सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा, सीना नदी, तलाव आणि ओढे तुडुंब भरून वाहत असून अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील शेती, पिके व पशुधन यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना तात्पुरते स्थलांतर करावे लागले आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर, बिरनाळ आणि होणमुर्गी या गावांना खा. प्रणिती शिंदे यांनी भेट देऊन पूरग्रस्तांची प्रत्यक्ष पाहणी केली व ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले की, स्थलांतरित नागरिकांसाठी अन्न-पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा तसेच जनावरांसाठी चाऱ्याची सोय तातडीने करण्यात येईल.

खा. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सणासुदीच्या काळात आलेल्या या अस्मानी संकटामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आणि जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. सीना नदीचे इतके भयानक व रौद्ररूप प्रथमच पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे व आवश्यक ती खबरदारी घ्यावी. तसेच त्यांनी आवाहन केले की, “या कठीण काळात नागरिकांनी धीर सोडू नये. आपणच एकमेकांचा आधार आहोत. आपल्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.यावेळी सुभाष देवकते, कांतु पुजारी, सरपंच सतीश देवकते, तुकाराम माळेवाडी, महेश मळेवाडी, पोलीस पाटील, बिराप्पा बिराजदार, राहुल देवकते, बिराप्पा सोनटकले, सिद्धाराम देवकते, उपसरपंच श्रीकांत स्वामी, चिदानंद बागले, निसार आत्तार, सिद्धाराम पुजारी, शिवानंद सालुटगी सुभाष तेली, राजू कोळी, रजाक निंबाळे, दावलजी मुल्ला, कलंदर कादरी, मुबारक लिंबाळे, दिलीप शेख, अमोगसिद्ध वाघमारे, बसवराज हसापुरे, सैफन नगारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
Reactions

Post a Comment

0 Comments