जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त भव्य मोटारसायकल रॅली
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट आणि अक्कलकोट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीचे उद्घाटन अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री. दीपकजी भिताडे साहेब यांच्या हस्ते प्लॅग दाखवून करण्यात आले.
रॅलीची सुरुवात श्री खंडोबा मंदिरापासून झाली. मार्गात एसटी स्टँड, कारंजा चौक, फत्तेसिंह चौक, एवन चौक या प्रमुख ठिकाणांमधून रॅलीने भव्य प्रेक्षणीय फेरी घेतली. शेवटी लायन्स शिशु व प्राथमिक शाळा अक्कलकोट येथे चहा-नाश्त्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
या रॅलीत तालुक्यातील महिला व पुरुष फार्मासिस्ट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. फार्मासिस्ट दिनाच्या जनजागृतीसाठी विविध स्लोगनसह फलक घेऊन, स्पीकरवर समाज प्रबोधन करण्यात आले. या उपक्रमासाठी मार्गदर्शन श्री. शिवशरण खुबा यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर माझी जिल्हा अध्यक्ष श्री. बसवराज मणूरे, उपाध्यक्ष श्री. सिद्धाराम घयाळे, तसेच तालुक्यातील मान्यवर फार्मासिस्ट व लायन्स क्लब सदस्य यांनी अथक प्रयत्न केले.
कार्यक्रमात लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट चे पदाधिकारी –
झोन चेअरमन लायन मल्लीकाजुन मसुती,
सचिव लायन शिरीष पंडीत,
खजिनदार लायन तेली,
झोन सेक्रेटरी लायन MJF महिबुब सलगरकर,
लायन सुभाष गडसिंग,
लायन काटगाव कापसे,
तसेच इतर लायन बंधू,
अक्कलकोट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट चे अध्यक्ष लायन अभय खोबरे यांनी श्री गंगाधर कापसे मानपत्र व सन्माननीय मोमेंटो देऊन सर्व उपस्थितांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर आरोग्यविषयक सेमिनारचे आयोजन करण्यात आले.
डॉ. करुणा कबाडी यांनी "स्ट्रेस व मानसिक स्वास्थ्य" या विषयावर मार्गदर्शन केले.
त्यानंतर डॉ. राहुल करीमुंगी यांनी "मानसिक स्वास्थ्य, स्ट्रेस व कार्डीयाक" या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन शिरीष पंडीत यांनी केले व आभार प्रदर्शनही त्यांनीच मानले.
हा कार्यक्रम भव्य, उत्साहवर्धक आणि यशस्वीरीत्या पार पडला.
लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट आणि अक्कलकोट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या या उपक्रमाचे शहरवासीयांनी कौतुक केले.
0 Comments