शिवस्मारक" उभे करायला सरकारला भाग पाडू- तानाजीराव शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 16, 2025

शिवस्मारक" उभे करायला सरकारला भाग पाडू- तानाजीराव शिंदे

 शिवस्मारक" उभे करायला सरकारला भाग पाडू- तानाजीराव शिंदे




 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या मुंबई येथील शिवस्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते होऊन देखील गेल्या ९ वर्षात त्या ठिकाणी एक वीट देखील रचली गेली नाही, छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सत्तेवर आलेले सरकार शिवस्मारकाच्या विषयी एवढे उदासीन का ? असा सवाल "स्वराज्य संग्राम" चे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी आज सोलापूर येथे झालेल्या "स्वराज्य संग्रामच्या" वर्धापन दिन मेळाव्यात केला.
    " स्वराज्य संग्राम" राज्यव्यापी मेळावा आज दिनांक 14 रोजी सोलापुरात संपन्न झाला त्यावेळी शिंदे बोलत होते.  शिवस्मारकाबरोबर देशात समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे,मराठा आरक्षण टिकले पाहिजे ,सारथी संस्थेची व्याप्ती वाढवली पाहिजे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून थेट कर्ज योजना सुरू करून छोट्या उद्योजकांना एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळाले पाहिजे, महाराष्ट्रातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आंदोलन उभारणे, रायगडावरील जगदीश्वरांच्या मंदिराचा जीर्णोद्धार शासनाने करावा, महाराष्ट्रातील महिला,युवक व विद्यार्थ्यांच्या विविध विषयावर काम करणे आदी प्रमुख मुद्द्यांवर सदर मेळाव्यात चर्चा झाली राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
   सदर मेळाव्यास स्वराज्य संग्रामचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत आंब्रे रत्नागिरी, उपाध्यक्ष अजित बानगुडे कराड, अनंतराव देशमुख रायगड,बाळासाहेब जटाळ बीड, शरद किनीकर लातूर,तसेच सचिव विशाल जाधव पुणे, सोलापूर जिल्हाध्यक्ष संग्रामसिंह पवार, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, ठाणे जिल्हाध्यक्ष प्रशांत मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी स्वराज्य संग्रामचे युवक कार्यकर्ते रामचंद्र शिंदे, माऊली जाधव, बाळासाहेब लांडे- पाटील, धनंजय चोबे ,गंगाधर गायकवाड, अमोल सुरवसे, आनंद गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर गायकवाड यांनी केले तर आभार आकाश पवार यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages