Hot Posts

6/recent/ticker-posts

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स सोलापूरच्या अध्यक्षपदी इंजी. बी. एम. जाधव

 असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स सोलापूरच्या अध्यक्षपदी इंजी. बी. एम. जाधव





सचिवपदी इंजि. संतोषकुमार बायस

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर येथीलअसोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स सोलापूर च्या अध्यक्षपदी इंजी. बी एम जाधव यांची आज संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमताने निवड करण्यात आली.

सोलापूरतील प्रसिद्ध हेरिटेज मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत वरील निवड करण्यात आली पुढील पदाधिकारी असे उपाध्यक्ष इंजी. वैभव होमकर सचिव संतोष कुमार बायस खजिनदार इंजी. मनोज महेंद्रकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

15 सप्टेंबर 2025 ते 15 सप्टेंबर 2027 पर्यंत यांचा कार्यकाळ असेल सदर कार्यकाळात असोसिएशन च्या अडचणी सोडवणे, अभ्यास दौरे करणे, सिविल अभियंत्याच्या उपयोगासाठी असणारे सेमिनार घेणे, सर्व शासकीय अधिकाऱ्यांबरोबर  टेक्निकली गोष्टींच्या चर्चा करून असोसिएशनच्या अभियंत्याच्या अडचणी सोडवणे. सामाजिक कार्य करणे असे विचार अध्यक्ष बी एम जाधव यांनी व्यक्त केले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थापत्य प्रदर्शन सोलापूरचे वैभव असून ते आधिका अधिक चांगले होण्या करिता प्रयत्न करणार आहोत असे त्यांनी सांगितले. पुढील कार्यकारणी सदस्य याप्रमाणे इंजी. हनुमानप्रसाद गज्जम, इंजी. जवाहर उपासे, इंजी. दत्तात्रय घोडके, इंजी. गणेश इंदापुरे इंजी सुनील दूधगुंडी इंजी. मनोहर लोमटे इंजिनीयर प्रवीण हेडगिरे, इंजी हरी चव्हाण इंजी नितीन पवार इंजी सतीश महिंद्रकर असे आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments