Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल शैक्षणिक संकुलात राहुरी विद्यापीठाच्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

 लोकमंगल शैक्षणिक संकुलात राहुरी विद्यापीठाच्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन




 (कटुसत्य वृत्त):-श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषि महाविद्यालय वडाळा येथे दिनांक ११ ते १२ सप्टेंबर या दरम्यान महात्मा फुले कृषि विद्यापीठामधील घटक महाविद्यालयाच्या आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन लोकमंगल शैक्षणिक संकुलातील क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात पार पडले. सदरील उद्घाटन समारंभास महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारे आणि श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित प्रख्यात हॉलीबॉल खेळाडू सौ.धनश्री देशपांडे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संस्थेच्या सचिव डॉ. अनिता ढोबळे यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित सर्व प्रमुख अतिथी आणि मान्यवर यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कृषी संलग्नित महाविद्यालयांचे समन्वयक डॉ. अमोल शिंदे यांनी लोकमंगल शैक्षणिक संकुलाचा चढता आलेख सर्वांसमोर मांडला. यानंतर प्रमुख पाहुण्यांचे आणि संघ व्यवस्थापकांचे स्वागत महाविद्यालयामार्फत करण्यात आले. या समवेत राहुरी विद्यापीठ खेळाडू निवड समितीतील सदस्य व पंच प्रतिनिधींचा सन्मान देखील करण्यात आला. उद्घाटनमूर्ती सौ.धनश्री देशपांडे यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थी जीवनातील खेळाडू वृत्ती व छंद जोपासले पाहिजे असे प्रतिपादन केले. यानंतर विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारी यांनी स्पर्धा पार पडत असताना नियमांचे पालन काटेकोरपणे व्हावे व स्पर्धा शिस्तपूर्ण आनंददायी वातावरणात पार पडाव्यात अशी आशा व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ.अनिता ढोबळे यांनी खेळाडूंच्या मनातील भावना उत्कटपणे मांडल्या व सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी राहुरी विद्यापीठ संलग्नित २४ मुलांचे संघ व १९ मुलींच्या संघाने सहभाग नोंदवला. सदरील कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लोकमंगल कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.सचिन फुगे यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन लोकमंगल कृषि महाविद्यालयाचे रासेयो स्वयंसेवक गणेश केदार आणि कु. गायत्री जाधव यांनी केले. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी लोकमंगल संकुलातील सर्व संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक वृंद, विद्यार्थी आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या सर्व रासेयो स्वयंसेवकांनी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. आंतर महाविद्यालयीन हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Reactions

Post a Comment

0 Comments