कला केंद्रात अभिषेक इंगळेने गोळी झाडल्याचे निष्पन्न
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी पासून जवळ असलेले टेंभुर्णी पंढरपूर रस्त्यावर वेणेगाव टें (पंढरपूर चौक )येथील जय मल्हार कला केंद्रावर घडलेल्या गोळीबाराने माढा तालुक्यात खळबळ उडाली होती या घटनेत जखमी देवा कोठावळे यांचेवर १९ वर्षीय अभिषेक दादासाहेब इंगळे व राहणार शेगाव दुमाला हल्ली राहणार. रामबाग पंढरपूर,याने गावठी पिस्तूल मधून गोळी झाडल्याचे तपासात निष्पन्न झाले असून यामध्ये फरार असलेला संशयित आरोपी ज्ञानेश्वर उर्फ महाराज पांडुरंग कडलास्कर याला पकडण्यासाठी दोन पोलिस पथके रवाना झाली असल्याची माहिती तपास अधिकारी पोसई कुलदिप सोनटक्के यांनी दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की टेंभूर्णी ता.माढा जवळील वेणेगाव हद्दीतील पंढरपूर चौकानजीक असलेल्या जय मल्हार लोकनाट्य कला केंद्रात नाचगाण्याची एकत्रीत बैठक लावण्याच्या कारणावरुन बुधवारी ९ रोजी च्या मध्यरात्री दोन गटात झालेल्या वादातून एकावर गोळीबार झालेल्या घटनेत पायाला गोळी लागल्याने दादा कोठावळे हा तरुण जखमी झाला होता या प्रकरणाचा टेंभुर्णी पोलीसांकडून तपास सुरू असून यात चौघांपैकी गोळी कोणी झाडली हे निष्पन्न झाले असून १९ वर्षीय अभिषेक दादासाहेब इंगळे याने गोळी झाडून जखमी केले असल्याची माहिती समोर आली असून.गोळी झाडलेली गावठी पिस्तूल होती का परदेशी बनावटीची होती हे मात्र अद्याप सिद्ध झाले नसले तरी ही गोळी का याबाबतही गोळी मारण्याचे पाठीमागचे खरे कारणं समजले नसले तरी पण लवकर या दोन गटातील भांडणाचा उलगडा होणार आहे
तसेच गुन्हा केल्यानंतर पिस्तूल कोठे लपवून ठेवली कि कोणाकडे लपवण्यास दिली.ती कोणाकडून घेतली ही माहिती आत्तापर्यंत समोर आली नसून तपास अधिकारी पोसई कुलदिप सोनटक्के हे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.


0 Comments