टेंभुर्णी शहरात उच्च शिक्षण सुरु करण्याची मागणी - बोबडे यांचे उच्च शिक्षण मंत्र्यांना निवेदन
टेंभुर्णी : शहरातील वाढती विद्यार्थी संख्या बघता या ठिकाणी उच्च शिक्षणाची गरज असून या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर विदयापीठ संलग्न बीएससी, बीकॉम, बीसीए, ईसीएस, बीबीए इत्यादी अभ्यासक्रम सुरु करण्याची मागणी भाजपा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे यांनी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे. टेंभुर्णी शहराची लोकसंख्या ५० हजाराचा पुढे असून आसपास चा खेड्यासह १ लाखाचा वरती आहे. या परिसरात १४ उच्च माध्यमिक विद्यालय असून यामध्ये ३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी विद्यार्थांना उच्च शिक्षणाची पुढील सोय नसल्याने पंढरपूर, अकलूज, इंदापूर, कुर्डुवाडी, बार्शी, पुणे किंवा सोलापूर येथे पुढील शिक्षण घेण्यासाठी जावे लागते. यामुळे विद्यार्थी व पालकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच मुलींना पालक बाहेर शिक्षणासाठी पाठवत नाहीत. यामुळे मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या ठिकाणी मोठी औदयोगिक वसाहत असून नोकरीचा संधी उपलब्ध आहेत. मात्र शैक्षणिक पात्रता नसल्याने रोजगाराची संधी मिळत नाही. टेंभुर्णी हे मध्यवर्ती ठिकाण असून आसपासचा विध्यार्थ्यांना सुद्धा सोईचे ठरणार आहे. यामुळे या ठिकाणी पदवी अभ्यासक्रम व पदवीउत्तर शिक्षण अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत विद्यापीठाचा बृहत आराखड्यात समावेश करण्याची मागणी योगेश बोबडे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार आंदळकर यांचाकडे केली आहे.
0 Comments