जनसुरक्षा विद्येयक मागे घेण्यासाठी मविआ निदर्शन आंदोलन..
टेंभुर्णी : (कटुसत्य वृत्त):- राज्य सरकारने मंजूर केलेले जनसुरक्षा विधेयक २०२४ हे माघारी घेण्यात यावे, यासाठी दि. १० रोजी सकाळी ११ वाजता महाविकास आघाडीचा वतीने येथील करमाळा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्या जवळ निवेदन देऊन निषेध व्यक्त केला. हे विधेयक सर्व सामान्य नागरिकांचे हक्क हिरावून घेणारे असून सामाजिक कार्यकर्त्यांची गळचेपी होणारे आहे. सरकार या कायद्याचा वापर करून विरोधातील लोकांना अटक करून गुन्हे दाखल करू शकते. यामुळे सर्वसामान्य लोकमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हे आंदोलन शिवसेना तालुका प्रमुख मधुकर देशमुख, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तालुका प्रमुख बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष युवक जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सुरेश भाऊ लोंढे,काँग्रेस तालुका अध्यक्ष संजय पाटील, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष समाधान अनपट यांचा नेतृत्वखाली निदर्शन करून निवेदन देण्यात आले. या वेळी अकोले बुद्रुक चे गटनेते सतिश सुर्वे, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य वैभव देशमुख- माहाडीक ,शिवसेना शराध्यक्ष संतोष खैरमोडे अमोल धुमाळ, कोंढर भागचे नेते भाऊ पवार
,टेंभुर्णी शहर उपप्रमुख प्रशांत सोनवणे , र्काँग्रेस हेमंत देशमुख,काँग्रेस अल्पसंख्यँक ता. अध्यक्ष जमीर काझी, किशोर देशमुख, प्रदीप तोडकर,संतोष ढवळे, गणेश सरवदे, महावीर लोंढे, हरिदास माने, किशोर नाळे, रफिक शेख, समाधान जगताप, महादेव जगताप, नानासाहेब गायकवाड, सोमनाथ लांडे, भालचंद्र पाटील,संपत काळे, अमित पाटील, प्रदीप तोडकर,लक्ष्मण जाधव आदी उपस्थित होते. यावेळी मागण्याचे निवेदन तलाठी शिवाजी घाडगे यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
0 Comments