एक हजार प्लाझ्माच्या बॅगा गुजरातला नेणारा टेम्पो महापालिकेने पकडला
सोलापूर, (कटुसत्य वृत्त):-
शहरातून गुजरातकडे एक हजार प्लाझ्मा बंगा भरून निघालेला टैम्पो सात रस्ता येथे पकडण्यात आला. महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी ही कारवाई केली, यामुळे मोठी खळबळ उडाली.
बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सात रस्ता येथे टेम्पोमधून एक हजार प्लाझ्मा बंगा नेणारा टेम्पो लोकांनी पकडला. याबाबतची माहिती मिळताच डॉ. माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहन तपासले असता प्लाझ्माच्या गा दिसून आल्या. टेम्पोमधून गुजरातकडे प्लाझ्माच्या एक हजार बॅगा नेण्यात येत होत्या, थर्माकोलच्या बॉक्समध्ये बर्फ ठेवून या बॅगा नेण्यात येत असल्याचे दिसून आले. अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने सर्व नियम मोडून अशा पध्दतीने प्लाझ्माच्या बॅगा नेण्यात येत होत्या.
या संदर्भात संबंधितांना विचारले असता शासनाची परवानगी असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य
अधिकारी डॉ. माने यांनी सोलापूर अन्न व औषध प्रशासन अधिकारी गोडसे यांना या संदर्भात माहिती
दिली. नियमानुसार अशा पध्दतीने टेम्पोमधून प्लाझ्माच्या बॅगा नेता त नाहीत, असे डॉ. माने यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे आणि उपायुक्त आशिष
लोकरे यांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर या प्लाझ्माच्या बॅगांसह तो टेम्पो सोलापूर शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आला. या संदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांना पूर्वसूचना दिली असल्याचे डॉ. माने यांनी सांगितले,
सोलापुरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असून रुग्णांना प्लाझ्माची गरज असतानाही एक हजार प्लाझ्माच्या
बॅगा गुजरातकडे कशा नेल्या जात होत्या. प्लाज्मा नेणारे वाहनही (जी जे ३८ टीए ६३१६) गुजरातचे आहे. वाहनधारकाला या संदर्भातील कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही डॉ. माने यांनी स्पष्ट केले.
चौकट
दोषी आढळल्यास कारवाई मोठे रॅकेट निघण्याची शक्यता गुजरातकडे घेऊन जात असलेल्या टेम्पोमधील एक हजार प्लाझ्माच्या बॅगा शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आल्या आहेत. प्लाझ्माच्या बॅगा खराब होऊ नये म्हणून ही कार्यवाही केली. याप्रकरणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असेही आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी स्पष्ट केले.
सोलापूर शहरातून अशा पध्दतीने परराज्यात प्लाझ्मा घेऊन जाणारे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर या प्रकरणात कारवाई केल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर मोठा दबाव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता याप्रकरणी संबंधितांवर कारवाई केलीच पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणांमुळे लोकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
अहवालासाठी प्लाझ्मा महापालिकेला दिला सात रस्ता येथून एका नागरिकाने डायल ११२ वर फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर सदर बझार पोलिसांनी धाव घेऊन प्लाझ्माचा टेम्पो पोलीस ठाण्यात आणला. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांना कळविण्यात आले. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्लाझ्माबाबत तपासणी करून अहवाल देण्यास त्यांना सांगितले आहे. नामदेव बंडगर, पोलीस निरीक्षक, सदर बझार
0 Comments