Hot Posts

6/recent/ticker-posts

मतदार यादी निश्चित; आता निवडणुकीची प्रतीक्षा

 मतदार यादी निश्चित; आता निवडणुकीची प्रतीक्षा

बार्शी, (कटुसत्य वृत्त):- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक मुदत संपल्यानंतर दोन वेळा सहा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. यानंतर निवडणूक प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. मतदार यादी अंतिम झाल्यामुळे आता ही निवडणूक अगदी उंबरठ्यावर आली आहे. 
बार्शी नगरपालिकेपूर्वी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होईल अशी शक्यता आहे. दरम्यान प्रारूप मतदार यादीवरील हरकतींची प्रक्रिया पूर्ण होऊन ५ हजार २५८ मतदारांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये हरकतीनंतर पूर्वीच्या यादीतील २०० नांवे वगळण्यात आली आहेत. दरम्यान जुलै २०२४ मध्ये संचालक मंडळाची मुदत संपली. त्यानंतर दोन वेळा सहा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. शिवाय काही काळ प्रशासक यांनीही कारभार पाहिला. या सगळ्या प्रक्रियेनंतर आता बार्शी बाजार समिती निवडणुकीच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. महत्त्वाचे
म्हणजे अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आल्याने आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला
की स्थानिक राजकारणातही अनेक घडामोडी होणार आहेत.
या निवडणुकीत आमदार अँड. दिलीप सोपल व माजी आमदार राजेंद्र राऊत अशी पारंपरिक लढत होणार हे निश्चित आहे. मतदार यादी अंतिम झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता वाढल्याने दोन्ही मातब्बर नेते यासाठी आता सज्ज झाले आहेत.
बार्शी नगरपालिकेची मुदत संपूनही चार वर्षांचा काळ लोटला आहे. बार्शी बाजार समिती निवडणूक पाठोपाठ नंतर नगरपालिका निवडणूक होईल, तथापि अनेक वर्षे आमदार सोपल यांच्या ताब्यात असलेल्या बार्शी बाजार समितीवर गतवेळी राऊत यांनी सत्ता मिळवली होती. नजीकच्या काळात होणान्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता वाशी व सोलापूर जिल्ह्यालाही आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments