Hot Posts

6/recent/ticker-posts

साेलापूर शहर विकास आराखडा सप्टेंबरअखेर होणार अंतिम

 साेलापूर शहर विकास आराखडा सप्टेंबरअखेर होणार अंतिम





शहर विकासाच्या २०२३-४३ आराखड्याला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. २०१७ पासून प्रलंबित असलेला हा आराखडा अखेर अंतिम टप्प्यात पोचला आहे.
आराखड्यातील ९२१ आरक्षणांवर शिक्कामोर्तब होणार की, नागरिकांच्या सूचना, आक्षेप व मागण्यांचा समावेश करून तो निश्चित करण्यात येणार आहे, याची स्पष्टता सप्टेंबर महिन्याअखेरपर्यंत होणार आहे.

महापालिकेकडून प्रारूप विकास आराखडा डिसेंबर २०२४ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये १७ प्रकारची ९२१ आरक्षणे निश्चित करण्यात आली होती. या आरक्षणांवर हरकतींसाठी १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत ३ हजार २०० हरकती महापालिकेला प्राप्त झाल्या. या आराखड्यामध्ये अनेक ठिकाणी जुनेच आरक्षण पुन्हा कायम ठेवण्यात आले आहे. त्यातील ६२५ आरक्षणे ही खासगी जागांवर होती.
Reactions

Post a Comment

0 Comments