महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने तयार
केलेला प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी बुधवारी
जाहीर केला. या प्रभाग रचनेवर काँग्रेस पक्षाने टीका केली असून भाजपला अनुकूल प्रभाग रचना केल्याचा आरोप त्यांनी प्रशासनावर केला आहे.
२०११ मध्ये झालेल्या जनगणनेतील लोकसंख्येचा आधार घेऊन हा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये २६ प्रभाग असून सदस्यांची संख्या १०२ आहे. चार सदस्यांचा एक प्रभाग याप्रमाणे २४ प्रभाग असतील तर तीन सदस्य असलेले दोन प्रभाग आहेत. प्रभाग रचना तयार करताना लोकसंख्येत दहा टक्के नैसर्गिक वाढ गृहीत धरण्यात आली. असल्याचे आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी पत्रकारांना सांगितले. निवडणूक आयोग आणि शासनाचा नगरविकास विभाग यांनी घालून भाजपला अनुकूल झाल्याचा विरोधकांचा आरोप दिलेल्या निकषानुसार ही प्रभाग रचना करण्यात आली आहे, असेही
त्यांनी स्पष्ट केले.
हा प्रारूप आराखडा महापालिकेच्या सप्टेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येईल. कौन्सिल नंतर ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान हा प्रारूप आराखडा अंतिम जाहीर होईल, असेही ओम्बासे यांनी सांगितले. या प्रारूप आराखड्याचे राज्य निवडणूक आयुक्तांसमोर २९ ऑगस्टला सादरीकरण झाले आहे. अशी माहितीही आयुक्तांनी दिली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
आरक्षणाची सोडत आयोगाच्या निर्देशानुसार काढली जाईल. मतदारांची संख्या जुलै २०२५ पर्यंतची निश्चित केली आहे. हॉलमध्ये लावण्यात आला आहे. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावरदेखील टाकला आहे. तो पाहून नागरिक १५ सप्टेंबरपर्यंत आपल्या हरकती व सूचना आमच्या निवडणूक कार्यालयात देऊ शकतात. १६ ते २२ सप्टेंबर दरम्यान जिल्हाधिकारी या हरकतींवर सुनावणी घेतील. २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान हा आराखडा शासनाच्या नगरविकास विभागाकडे जाईल. तिथून तो २६ ते ३० याबाबतीत आयोग किंवा शासन जो आदेश देतील त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल असेहीआयुक्त ओम्बासे यांनी सांगितले. प्रभाग रचना तयार करताना महानगरपालिका क्षेत्रातील कोणतेही प्रगणक गट फोडण्यात आलेले नाहीत. प्रभागाची लोकसंख्या त्या प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के कमी किंवा जास्त या मर्यादितच ठेवण्यात आलेली आहे. केवळ प्रभाग क्र. ६ व २६ या २ प्रभागांची लोकसंख्या कमाल मर्यादेपेक्षा अनुक्रमे ३० व २४ ने जास्त आहे. प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, नाले, रस्ते, रेल्वे रुळ फ्लायओव्हर इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन निश्चित करण्यात आली आहे. या प्रभागास आवश्यक रस्ता, फ्लायओवर याचा विचार करून प्रभागाची रचना करण्यात आली आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
प्रारूप प्रभागांचे एकत्रित नकाशा तसेच प्रत्येक प्रभागाचे स्वतंत्र नकाशे सोलापूर महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉल येथे कार्यालयीन वेळेत सर्व नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असतील. प्रारूप प्रभागांचा एकत्रित नकाशा महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयामध्येही प्रसिध्द करण्यात आला आहे. प्रारूप प्रभागांचा एकत्रित नकाशा व सर्व प्रभागांचे नकाशे आणि अधिसूचना सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ www. solapurcorporation. gov.in प्रसिद्ध करण्यात येईल, असे डॉ. ओम्बासे यांनी सांगितले, या पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर रचना उपसंचालक मनीष भिष्णुरकर, नगर अभियंता सारिका आकुलवार, निवडणूक विभागाचे अधीक्षक ओमप्रकाश वाघमारे, सहायक अभियंता महेश क्षीरसागर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
चौकट १
शासनाचा हस्तक्षेप
निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे अधिकार निवडणूक आयोगाचे असताना राज्य शासन यामध्ये हस्तक्षेप करीत आहे. प्रभागाची संख्या आणि सदस्यसंख्या ठरवण्याचे अधिकार शासनाचे आहेत. प्रभाग रचना तयार करण्याबाबत महापालिकेला आदेश देण्याचे अधिकार निवडणूक आयोगाचे आहेत. कारण निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या तसेच २०२२ मध्ये होऊ घातलेल्या पण न झालेल्या निवडणुकीची प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. यावेळी आयोगाबरोबरच शासनाच्या नगरविकास खात्यानेही महापालिकेला प्रभाग रचनेबाबतचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे सगळीकडे सूचना व हरकतीसाठी पंधरा दिवसांची मुदत आहे. परंतु यावेळी सोलापूर महापालिकेला फक्त बारा दिवस दिले आहेत. शासनाच्या या हस्तक्षेपावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
चौकट २
नकाशांसाठी शुल्क आकारणी
प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यातील सर्व प्रभागांचा एकत्रित नकाशा हवा असल्यास सात हजार रुपये भरावे लागतील. एका प्रभागाच्या नकाशासाठी सातशे रुपये शुल्क आहे. शासनाची अधिसूचना हवी असेल तर प्रत्येक पानास तीन रुपयांप्रमाणे आकारणी केली जाईल. नकाशा मिळण्यासाठी नागरिकांनी अभिलेखापाल कार्यालय, सोलापूर महानगरपालिका येथे अर्ज करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
हरकतीसाठी १५ सप्टेंबरची मुदत
प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांनी हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी ३ ते १५ सप्टेंबर दुपारी ३ पर्यंत आहे. या हरकती व सूचना सोलापूर महानगरपालिका निवडणूक कार्यालय, डॉ. द्वारकानाथ कोटणीस शॉपिंग सेंटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सोलापूर येथे प्रत्यक्ष सादर करा..
0 Comments