Hot Posts

6/recent/ticker-posts

यापुढेही लोकगीते अजरामरच राहणार : स्वप्निल रास्ते

                               यापुढेही लोकगीते अजरामरच राहणार : स्वप्निल रास्ते



विवेकानंद प्रतिष्ठानच्या उत्सव लोकगीतांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अक्कलकोट : (कटूसत्य वृत्त):- लोकगीत गावागावांपर्यंत पोहोचले आहे. ते कधीच संपणारे नाही. लोकगीताचा प्रारंभ कोकणातून झाला. गायकांबरोबर वाद चांगला असेल तर गायकाला स्फूर्ती चढते. दोघेही उत्तम असेल तर चांगल्या गायनाची निर्मिती होते. चोखंदळ प्रेक्षक व त्यांच्याकडून मोठा प्रतिसाद मिळाल्यास कला परमोच्च शिखर गाठते, असे प्रतिपादन निमति, संकल्पना निवेदक स्वप्निल रास्ते यांनी केले. 
रास्ते यांच्या उत्सव लोकगीतांच्या कार्यक्रमात गायक सुजित सोमण, वेदिका दामले, अमिता घुगरी यांनी सादर केलेल्या रसिक श्रोत्यांच्या ओठांवरील गीतांनी अक्कलकोटकरांची सांज अविस्मरणीय ठरली.
विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ५ वे पुष्प लोकगीतांच्या कार्यक्रमाने गुंफण्यात आले. प्रारंभी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन
संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्रा. भीमराव साठे, मुकुंद पतकी, बसवराज शास्त्री, राचप्पा वागदरे, मनोहर चव्हाण, ओमप्रकाश तळेकर आदींच्या हस्ते करण्यात आले. स्वप्निल रास्ते व सहकाऱ्यांचा सत्कार संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी तर सर्व कलाकारांचा परिचय बापूजी निंबाळकर यांनी
करून दिला.
चौकट 
लोकगीतांचे सादरीकरण
गणेश वंदना, छत्रपती शिवरायांची आरती, गणगौळण, भूपाळी, जांभुळ पिकल्या झाडाखाली, आम्ही ठाकरं.. या रानाची पाखरं, धनगराची मेंढर व पोवाडे अशी प्रेक्षकांच्या ओठावरील लोकगीते सादर करून श्रोत्यांची मोठी वाहवा मिळवली.
Reactions

Post a Comment

0 Comments