Hot Posts

6/recent/ticker-posts

गणेश विसर्जन प्रसंगी उत्साहाबरोबर सुरक्षितताही महत्त्वाची : पोलीस अधीक्षक कुलकर्णी

 गणेश विसर्जन प्रसंगी उत्साहाबरोबर सुरक्षितताही महत्त्वाची : पोलीस अधीक्षक कुलकर्णी


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- 
डॉल्बीमुक्त वातावरणात गणेशोत्सव विसर्जनासाठीच्या जुन्या लांबोटी पुलाला अधीक्षकांची भेट
साजरा करण्याबरोबर गणेश विसर्जन प्रसंगी देखील सर्व नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेण्याबरोबर प्रशासनाने केलेल्या नियमांचे पालन करून गणेश विसर्जन करावे. वाहतुकीच्या नियोजना बरोबर विसर्जन प्रसंगी होत असलेल्या गर्दीबाबत देखील आवश्यक त्या सूचना स्थानिक पोलीस प्रशासनास देत आहोत. पोलीस प्रशासनासह, नगरपरिषद त्याचबरोबर स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये सुरक्षिततेबाबत उत्तम समन्वय असणे आवश्यक आहे. तरच हा शांततेत सुरू असलेला गणेशोत्सवाबरोबर सुरक्षित वातावरणातही विसर्जन सोहळाही पार पडून हा मंगलमय उत्सव आनंददायी होईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मोहोळ येथे केले.
मोहोळ शहर आणि परिसरातील घरगुती तसेच सार्वजनिक गणेश उत्सवाचे विसर्जन सीना नदीवरील कोळेगाव- लांबोटी येथील जुन्या पूलावर केले जाते. या महत्त्वाच्या विसर्जन स्थळाची पाहणी करून बंदोबस्ताच्या दृष्टीने आवश्यक सूचना देण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या ठिकाणाला भेट दिली. यावेळी त्यांनी विसर्जनाच्या वेळी घ्यावयाची दक्षता आणि गर्दीचे व्यवस्थापन
याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी अधिक्षक कुलकर्णी म्हणाले की, विसर्जन स्थळी सुरक्षिततेसाठी प्रखर प्रकाशाची व्यवस्था, निष्णात पोहणाऱ्या व्यक्ती आणि पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती, सीना नदीच्या पत्रात तीव्र प्रवाह आणि खोल पाण्यात विसर्जन टाळावे. पोलिसांनी निर्देशित केलेल्या ठिकाणीच विसर्जन करावे, असे आवाहन यावेळी पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी उपस्थितांना केले. या पाहणीवेळी पोलीस उपअधीक्षक संकेत देऊळकर, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, कोळेगावचे उपसरपंच महादेव देशमुख, ग्रामसेवक अभिजित लवळे, ग्रामसेवक, कोळेगाव-लांबोटीचे पोलीस पाटील उपस्थित होते.
चौकट 
सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर भर
नदीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलीस प्रशासन पूर्वदक्षतेचा भाग म्हणून पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुरक्षिततेच्या उपाययोजनावर भर देत आहोत. सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करत मोठ्या मूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी आणाव्यात. वाहने निर्देशित पार्किंग स्थळीच पार्क करावीत. स्थानिक प्रशासनाने ठरवलेल्या ठिकाणांचा, जसे की कृत्रिम तलाव, विसर्जनासाठी वापर करावा. विसर्जन स्थळी आपत्कालीन परिस्थितीत उपयोगासाठी महसूल प्रशासनाकडून बोट व्यवस्था केली आहे.
                                                                                 - हेमंत शेडगे, पोलीस निरीक्षक, मोहोळ
Reactions

Post a Comment

0 Comments