Hot Posts

6/recent/ticker-posts

फडणवीसांना पत्र

 फडणवीसांना पत्र 


प्रति 

श्री. देवेंद्र फडणवीस जी

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 

विषय: आपण ज्यांना रस्त्यावरून उचलून आमदार केले त्यांच्या कडून सातत्याने जयंत पाटील यांच्यासारख्या वरीष्ठ नेत्यांवर अत्यंत दर्जाहीन भाषेत टीका होत असलेबाबत... 

महोदय, 

वरील विषयानुसार कारणे विनंती की, 

आपण स्वतः स्वकर्तृत्वावर आज या पदावर विराजमान आहात. व आपणाकडून सार्वजनिक राजकीय कारकीर्दीत कधीच कुणावरही अर्वाच्य भाषेत भावना व्यक्त करताना पाहिले नाही. मी आपला समर्थक किंवा भाजप कार्यकर्ता नाही परंतु मी आपल्या राजकीय खेळींचा, विरोधी बाकावर बसताना आपल्या भाषणांचा चाहता आहे. 

आपण राजकीय जीवनामध्ये वावरताना ज्येष्ठ व कनिष्ठ राजकीय पुढाऱ्यांसाठी आदर्शवत वक्तव्य किंवा टीका टिपणी करत असताना त्याच वेळेस आपल्या कृपाशीर्वादाने पात्रता नसतानाही आमदार झालेले काही लोक अत्यंत अर्वाच्य भाषेत वयाचे भान न ठेवता टीका करत आहेत. तुमच्या व्यतिरिक्त अशा व्यक्तींना अन्य कोणत्याही भाजपच्या पुढाऱ्याने भाजपामध्ये स्थान दिले नसते परंतु तुम्ही त्यांना वरदहस्त देऊन आमदार केले किमान त्यांना तारतम्य बाळगाण्याचा सल्ला द्यावा ही माफक अपेक्षा ....

एक सोलापूरकर

Reactions

Post a Comment

0 Comments