Hot Posts

6/recent/ticker-posts

गोपीचंद पडळकर अश्लाघ्य बोलल्याबद्दल, विरोधी पक्ष अजूनही संयम सोडत नाही

  गोपीचंद पडळकर अश्लाघ्य बोलल्याबद्दल,  

विरोधी पक्ष अजूनही संयम सोडत नाही 


गोपीचंद पडळकर अश्लाघ्य बोलल्याबद्दल शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नापसंती व्यक्त केली अशी बातमी वाचली. विरोधी पक्ष अजूनही संयम सोडत नाही असा त्याचा अर्थ.

एक वाह्यात राजकीय संस्कृती महाराष्ट्रात 2014 नंतर चांगलीच रुजली. काल म्हस्के नावाचे शिंदेगटवाले अक्षरशः गल्लीतल्या टपोरी सारखे बोलतांना पाहिले चॅनलवर. गोपीचंद पडळकरचं जयंत पाटील यांच्याबाबतचं वक्तव्य इतकं हिणकस आहे की त्याची इतर ठिकाणी वाच्यता करणंही असभ्य आहे. मी पडळकरच्या वक्तव्याचा निषेधही करणार नाही कारण निषेध ज्याचा करायचा ते वक्तव्यही काही एका दर्ज्याचं असावं लागतं. फडणवीस-शिंदेंनी पोसलेल्या कोणीही उठावे आणि कोणाच्याही आईबापाचा उद्धार करावा इतकी वाईट अवस्था आहे. फडणवीस आणि शिंदे आपापल्या माणसांना कोणतीही तंबी देत नाही याचा अर्थ ते अशा लोकांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत असाच होतो. ही अवस्था चिंताजनक आहे. 

महाराष्ट्राचा राजकीय अवकाश बघताबघता फडणवीस आणि शिंदेंनी  वाढवलेल्या माणसांनी व्यापला गेला आणि आज ही लज्जास्पद अवस्था झाली या महान राज्याची. राणे, राणा, सदावर्ते, कंभोज, पडळकर, महाजन, फुके, लाड, कदम, वाघ ही फडणवीस यांनी महाराष्ट्राला दिलेली सांस्कृतिक भेट. तर शिंदे-गटात तेवढीच भीषण अवस्था आहे. तिकडची आडनावं लिहीत बसलं तर फेसबुकची शब्दमर्यादा संपेल. भरीस भर अजितदादांनी पोसलेले चारपाच गणंग आहेतच.

संस्कृती आणि सभ्यतेच्या दृष्टीनं राज्यानं नवा तळ गाठलेला आपण पहात आहोत. हा काळ कदाचित महाराष्ट्रीय सभ्यतेचा सगळ्यात वाईट काळ असेल.

जेष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी यांच्या फेसबुक पेज वरून

Reactions

Post a Comment

0 Comments