दसरा आणि दिवाळी दरम्यान विशेष गाड्या धावणार
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-
आगामी दसरा आणि दिवाळी उत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने सोलापूर विभागातून विविध ठिकाणी २३० विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
लातूर- हडपसर विशेष गाड्या (७४ फेन्या)
ट्रेन क्रमांक ०१४२९ विशेष ट्रेन २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत दर सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी लातूरहून सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता हडपसरला पोहोचेल. (३७ फेन्या)
ट्रेन क्रमांक ०१४३० ही विशेष गाडी २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत दर सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी हडपसर येथून दुपारी ४.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ९.२० वाजता लातूरला पोहोचेल. (३७ फेन्या)
या गाडीला हरंगुल, मुरुड, धाराशिव, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, जेऊर आणि दौंड या ठिकाणी थांबे देण्यात आले आहे. एलटीटी मुंबई-लातूर साप्ताहिक विशेष (२० फेऱ्या)
ट्रेन क्रमांक ०१००७ साप्ताहिक विशेष २८ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत दर रविवारी एलटीटी मुंबईहून रात्री १२.५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता लातूरला पोहोचेल.
(१० फेल्या)
ट्रेन क्रमांक ०१००८ साप्ताहिक विशेष २८ सप्टेंबर से ३० डिसेंबरपर्यंत दर रविवारी दुपारी ४.०० वाजता लातूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०४.५० वाजता एलटीटी मुंबईला पोहोचेल. (१० फेऱ्या) या गाडीला ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुटूंबाडी आणि धाराशिव आदी ठिकाणी थांबे देण्यात आले आहे. दौंड-कलबुरगी अनारक्षित आठवड्यातून ५ दिवस विशेष (१६ फेऱ्या)
ट्रेन क्रमांक ०१४२१ अनारक्षित विशेष २६ सप्टेंबर ते १ डिसेंबरपर्यंत दर सोमवार मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी दौंड येथून सकाळी ५.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११.२० वाजता कलबुरगी येथे पोहोचेल. (४८ फेऱ्या)
ट्रेन क्रमांक ०९४२२ अनारक्षित विशेष २६ सप्टेंबर ते १ डिसेंबरपर्यंत दर सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी कलबुरगी येथून दुपारी ४.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.२० वाजता दौंड येथे पोहोचेल. (४८ फेऱ्या) या गाडीला भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुटूंबाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, होटगी, अक्कलकोट रोड, बोरोटी, दुधनी आणि गाणगापूर रोड येथे
थांबे देण्यात आले आहेत.
दौड कलबुरगी द्वि-आठवड्यातील (४० फेऱ्या) अनारक्षित विशेष
ट्रेन क्रमांक ०१४२५ अनारक्षित विशेष ट्रेन २५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत दर गुरुवार आणि रविवारी दोंडहून सकाळी ५.०० सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११.२० वाजता कलबुरगीला पोहोचेल. (२० फेऱ्या) ट्रेन क्रमांक ०१४२६ अनारक्षित विशेष ट्रेन दर गुरुवार आणि रविवारी कलबुरगी येथून रात्री ८.३० वाजता सुटेल आणि दौंडला मध्यरात्री २.३० वाजता पोहोचेल. (२० फेऱ्या).
0 Comments