कुर्डू येथील बेकायदेशीर मुरूम उत्खननाबाबत
खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली केंद्रीय सचिवांची भेट
अकलूज (कटूसत्य वृत्त):- खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील माढा तालुक्यातील कुर्डू येथील वनविभागाच्या जमिनीवर सुरू असलेल्या बेकायदेशीर मुरूम उत्खननाच्या गंभीर समस्येबाबत केंद्रीय वन विभागाचे सचिव तन्मय कुमार यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.
कुर्डू येथील वनजमिनीतून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मुरूम उत्खनन सुरू आहे. याला आळा घालण्यासाठी रेंज फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी वारंवार प्रयत्न केले, परंतु कुर्डूवाडी पोलिस ठाण्याकडून याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. वनरक्षक मोडनींब यांनी याबाबत सोलापूर ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी विनंती करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय सचिव तन्मय कुमार यांच्याकडे बेकायदेशीर उत्खनन रोखण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत राज्य सरकारला निर्देश देण्याची मागणीही त्यांनी केली.
0 Comments