महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्त सेवा):- उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन हे विजयी झाले आहेत. त्यामुळे ते आता भारताचे १७ वे उपराष्ट्रपती ठरले आहेत.
त्यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन यांना पराभूत केलं आहे. उपराष्ट्रपती पदासाठी आज(मंगळवार) मतदान प्रक्रिया पार पडली. सी.पी.राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीचे ४५२ मतं मिळाली. तर बी. सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची ३०० मतं मिळाली.
भारतीय संसदेत लोकसभा आणि राज्यसभेसह एकूण ७८८ खासदार आहेत. सध्या दोन्ही सभागृहात ७ जागा रिक्त आहेत. अशाप्रकारे, एकूण ७८१ खासदारांना मतदान करायचे होते, त्यापैकी १३ जणांनी मतदानात भाग घेतला नाही. यामध्ये बीआरएसचे ४, बीजेडीचे ७, अकाली दलाचे १ आणि १ अपक्ष खासदाराने मतदान केले नाही. तर ४२७ एनडीए खासदारांनी मतदान केले. या निवडणुकीत एकूण ७६८ खासदारांकडून मतदान झाले.
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान मंगळवारी सकाळी १० वाजता सुरू झाले आणि संध्याकाळी ५ वाजता संपले. मतदान संपल्यानंतर, काँग्रेसने सांगितले होते की उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षात एकजूट राहिली. सर्व ३१५ खासदारांनी मतदान केले आहे. परंतु निकाल जाहीर झाल्यानंतर १५ मतं फुटल्याचे समोर आले आहे.
फेब्रुवारी २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत त्यांनी झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहिले, तसेच मार्च ते जुलै २०२४ दरम्यान तेलंगाना आणि मार्च ते ऑगस्ट २०२४ दरम्यान पुदुच्चेरीच्या उपराज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला. ३१ जुलै २०२४ पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.
0 Comments