टप्पा अनुदान आदेशासाठी शिबीर आयोजित करा
प्राथमिक शाळा संयुक्त कृती समितीची शिक्षणाधिकार्यांकडे मागणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अंशत: अनुदानित शाळा व तुकड्यांना वाढीव टप्पा अनुदानाचे आदेश देण्यासाठी शिबीराचे आयोजन करावे.अशी मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडे केल्याची माहीती डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनिल चव्हाण यांनी दिली.
डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद,राज्य शिक्षक सेना,युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी कादर शेख यांची भेट घेऊन ही मागणी केली.या शिष्टमंडळात सुनिल चव्हाण,आप्पाराव इटेकर,अ.गफुर अरब, विजयकुमार बडुरे,बरगली लांडगे,भिमाशंकर हुबळी आदी उपस्थित होते.शासननिर्णय २५ आॅगस्ट २०२५ नुसार शासनाने अंशत: अनुदानित तुकड्यांना वाढीव टप्पा अनुदान मंजुर केले आहे. सध्या टप्यावरील ४६ शाळांतील १८५ शिक्षक कार्यरत आहेत.नव्याने १० शाळा टप्पा अनुदानास पात्र झाल्या असुन ३२ शिक्षक कार्यरत आहेत.वाढीव टप्पा अनुदानाचे आदेश देण्याची आदेश देण्याची प्रक्रीया पारदर्शकपणे राबवण्याची मागणी करण्यात आली.यासाठी एकदिवसीय शिबीराचे आयोजन करुन शिबीरातच वाढीव टप्पा अनुदानाच्य आदेशाचे वाटप करण्यात यावे.शिबीराचे आयोजन करुन तेथेच पत्र देण्याची प्रक्रीया पार पाडण्यात येईल.असे आश्वासन शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.
0 Comments