ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं आमदार देवेंद्र कोठे यांचा विशेष सन्मान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार देवेंद्र कोठे यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून राज्य विधिमंडळ सचिवालयाकडून त्यांची नुकतीच निवड झाली तसेच सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ मधील आदिशक्ती माता चौक ते सलगर वस्ती पोलीस स्टेशन पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे कामासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत ७२ लाख रुपये या रस्त्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. यानिमित्त ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं आमदार देवेंद्र कोठे यांचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी अक्कलकोट निवासी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती, मखमली टोपी, पुष्पगुच्छ, शाल पांघरून त्यांचा विशेष सन्मान केला. महायुती सरकार मध्ये राष्ट्रवादी पक्ष हा घटक पक्ष म्हणून सक्रिय आहे माहायुती सरकार यातील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सोबत घेऊन आजपर्यंत आपण कार्य करीत आहोत याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मागणीनुसार प्रभाग क्रमांक २२ येथील रस्त्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला या पुढील काळात देखील प्रभाग २२ च्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही देखील यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी किसन जाधव यांना दिली.किसन जाधव आणि नागेश गायकवाड हे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी तत्पर असतात नागरिकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी ते नेहमी धडपड करीत असतात प्रभागाचा विकास हाच त्यांचा ध्यास असे त्यांचे कार्य असल्याचेही यावेळी आमदार कोठे म्हणाले. या सत्कार सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, फिरोज पठाण, माणिक कांबळे, वसंत कांबळे, महादेव राठोड आदींची उपस्थिती होती. दरम्यान शारदीय नवरात्र महोत्सव आणि घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील हा रस्ता पूर्ण व्हावा या उद्देशाने आमदार देवेंद्र कोठे यांनी विशेष लक्ष दिले असल्याचेही यावेळी किसन जाधव म्हणाले.
0 Comments