पूरग्रस्तांना दिलासा : खा.शिंदेंच्या वतीने चादरींचे वाटप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अलीकडील अतिवृष्टी आणि पुरामुळे हत्तूरसह परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. घरांची हानी, संसारोपयोगी वस्तूंचा नाश आणि थंडीत उब मिळवण्यासाठी साधनांची कमतरता अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर आज खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने हत्तूर गावात पूरग्रस्त कुटुंबांना चादरींचे वाटप करण्यात आले. “एक हात मदतीचा” या भावनेतून मायेची ऊब देणाऱ्या या चादरी ग्रामस्थांपर्यंत पोहोचवून त्यांना दिलासा देण्यात आला.पूरामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना या मदतीमुळे थोडासा दिलासा मिळाला असून ग्रामस्थांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली.

0 Comments