रोहन सुरवसे पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का
"तमाम कार्यकर्त्यांसह सुरवसे पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश"
पुणे (कटूसत्य वृत्त):- रोहन सुरवसे पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून,तमाम कार्यकर्त्यांसह रोहन सुरवसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार) जाहीर प्रवेश केला आहे.
काहीं वर्षापासून, पुणे शहर आणि जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला दिवसेंदिवस भगदाड पडत चालले आहे.पक्षातील अंतर्गत कुरघोडीला कंटाळून, युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी, अखेर काँग्रेसला कायमचा रामराम ठोकत, शुक्रवारी सकाळी तमाम कार्यकर्त्यांसह, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला. विशेष म्हणजे रोहन सुरवसे पाटील यांच्यासह, युवक काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत दाखल होत, पक्षाला संघटनात्मक बळ देण्याचे काम केले आहे.यामुळे येणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने, राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्यानंतर,रोहन सुरवसे पाटील कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे गुलदस्त्यात होते.रोहन सुरवसे पाटील कोणत्या पक्षात प्रवेश करतील,याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अलीकडेच बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात, रोहन सुरवसे पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता. 26 सप्टेंबरचा मुहूर्त साधत,रोहन सुरवसे पाटील यांनी शिवाजीनगर येथील, पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात औपचारिक पक्ष प्रवेश केला.
या प्रवेश सोहळा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरवसे पाटील यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करत “पक्षात चांगले काम कराल” असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष सुनील टिंगरे, आमदार शंकर मांडेकर, माजी आमदार रमेश थोरात, महादेव बाबार, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, तसेच सुभाष जगताप, राकेश कामठे, प्रदीप देशमुख, रुपेश संत आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात रोहन सुरवसे पाटील यांच्यासह सागर नायकुडे, पुष्कर ढमाले, आकाश नवले, देवेंद्र खाटेर, ज्ञानेश्वर जाधव, सोनू आंधळे, सचिन मोरे, सत्यजित गायकवाड, दीपक चौगुले, आदित्य शेटे, निखिल मुळीक, अॅड. सुधीर शिंदे, प्रशांत मोरे आणि गणेश शिंदे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
*अजितदादां सोबत काम करणार : रोहन सुरवसे पाटील*
“अजित पवार यांच्यासारखे कोणताही नेता काम करत नाही. त्यांचे काम पाहुन आम्ही प्रभावित झालो असून, त्यामुळेच त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. दादा जे जबाबदारी देतील, त्यानुसार मी आणि माझे सहकारी पूर्ण ताकदीने काम करू,”असा विश्वास रोहन सुरवसे पाटील यांनी व्यक्त केली.

0 Comments