Hot Posts

6/recent/ticker-posts

महापुरातून सावरेपर्यंत पुन्हा पुराची धास्ती

 महापुरातून सावरेपर्यंत पुन्हा पुराची धास्ती 



 


मोहोळ (कटूसत्य वृत्त):-सीना नदीचा महापूर ओसरत नाही तोच सीना कोळेगाव प्रकल्पामधून नदी पात्रामध्ये पाणी सोडण्याबाबतचे पत्र जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता, सीना कोळेगाव प्रकल्प विभाग, परंडा, यांनी प्रसिद्ध केले आहे.  यामुळे दोन दिवसांपूर्वीच्या महापुराने अतोनात नुकसान झालेल्या सीना नदी काठच्या शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेसह भीतीचे वातावरण पसरले आहे.

आपत्ती व्यवस्थापक परंडा यांनी तत्काळ प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे सीना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पशुधन आणि कुटुंबासह सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. लहान मुले, वयोवृद्ध नागरिक, गरोदर स्त्रियांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. सीना कोळेगावच्या पाणलोट क्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. पूरस्थितीची शक्यता धरून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

क. वि. कालेकर, कार्यकारी अभियंता, सीना कोळेगाव प्रकल्प विभाग, परंडाधरणामध्ये सध्या 35 हजार 100 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. 30 तारखेपर्यंत पाऊस झाल्यास पाण्याची आवक आणखी वाढेल. त्यामुळे धरणातून नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. तरी सीना नदीकाठच्या लोकांनी सावध राहावे, सुरक्षित स्थळी जावे. जनावरे व इतर साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे.
Reactions

Post a Comment

0 Comments