Hot Posts

6/recent/ticker-posts

गावाच्या विकासासाठी व्यवसायिकांना कर्ज पुरवठा : चेअरमन राजेश चंकेश्वरा

 गावाच्या विकासासाठी व्यवसायिकांना कर्ज पुरवठा : चेअरमन राजेश चंकेश्वरा




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते शहराची बाजारपेठ मोठी असल्याने नातेपुते परिसरातील अनेक खेडोपाडीचे आर्थिक व्यवहार नातेपुते शहराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतात. चंद्रप्रभू ही पतसंस्था नेहमीच सामाजिक बांधिलकी व ग्राहकाचे हित जोपासत आली आहे. गावाच्या विकासासाठी अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांना कर्ज उपलब्ध करून व्यवसाय करण्याची संधी दिली.
सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य असल्यामुळे ऑडिट वर्ग ( अ ) असुन पतसंस्थेत १५ कोटी १७ लाखाच्या ठेवी, कर्जवाटप ११ कोटी ५० लाख, गुंतवणूक १२ कोटी ७८ लाख, भाग भांडवल ३६ लाख ३१ हजार असुन पतसंस्थेची नेत्रदीप प्रगती असल्याचे मत पतसंस्थेचे चेअरमन राजेश चंकेश्वरा यांनी व्यक्त करून. सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर केला.
                 ते नातेपुते येथील चंद्रप्रभू पतसंस्थेच्या २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी बोलत होते.  .
यावेळी माजी आ. रामहरी रुपनवर, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बाहुबली चंकेश्वरा, अर्जुन जठार, नगरसेवक अविनाश दोशी, उद्योजक अतुल बावकर, महेश शेटे, अमृतलाल गांधी, चेअरमन राजेश चंकेश्वरा, व्हा. चेअरमन अतुल गांधी, संचालक अनिलकुमार दोशी, अॅड. राजेंद्रकुमार गांधी, रवींदु डुडू, महावीर गांधी, मनोज दावडा, सुरेंद्र दावडा, माणिक बरडकर, वैभव दोशी, विनोद दोशी, सुरेश दोशी, शितलकुमार देसाई, जितेंद्र दोशी, सुकुमार दोशी, सुभाष दोशी, पि. के. सावंत, विजयकुमार गांधी, शर्मिला चांगण, अरविंद डुडू, राहुल गांधी, सुदर्शन दावडा, वज्रकुमार चंकेश्वरा, नीलकुमार गांधी, पतसंस्थेच्या सचिव वैशाली बंदिष्ठे, उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सभेचा सुरूवात भगवान चंद्रप्रभू यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सभेच्या  अंदाजपत्रकाचे वाचन संचालक विनोद दोशी यांनी केले.विषय वाचन वसुली अधिकारी अजय कुलकर्णी यांनी तर अध्यक्षीय निवड सुरेंद्र दावडा यांनी व ताळेबंद वाचन महावीर गांधी यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन निवेदक संदिप जाधव यांनी केले तर आभार अतुल गांधी यांनी मानले.यावेळी सभेसाठी व्यापारी वर्ग, संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार, कर्जदार, पतसंस्थेचे कर्मचारी व पिग्मी एजंट, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

चौकटीत :
चांगल्या कर्जदारांमुळे संस्था स्थापनेपासून आदर्श दर्जा राखून नफ्याने व आर्थिक शिस्तीने एक नंबरची संस्था व संस्थेत स्थापनेपासून राजकारणाचा हस्तक्षेप नसल्याने कर्जदार चांगले आहेत वेळेवर पैसे भरतात. शहरात निकोप स्पर्धा असल्याने प्रत्येक पतसंस्था चांगली चालत आहे.
( मा. आ. रामहरी रुपनवर )

चौकटीत :

स्थापनेपासून राज्यातील आर्थिक शिस्त असलेली प्रमुख संस्था असल्यामुळे संस्थेला चिंता नाही. संस्थेचा आदर इतर पतसंस्थेने घेणे गरजेचे आहे. कार्यक्षम संचालक मंडळ असल्यामुळे आर्थिक शिस्त असणारी चंद्रप्रभू पतसंस्था म्हणून नावलौकिक आहे.

बाबाराजे देशमुख (मा. सोलापूर जि.प. उपाध्यक्ष )


फोटो ओळी : पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन राजेश चंकेश्वरा

Reactions

Post a Comment

0 Comments