निदान झाल्यास उपचाराने कॅन्सर बरा होतो - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 15, 2025

निदान झाल्यास उपचाराने कॅन्सर बरा होतो

 निदान झाल्यास उपचाराने कॅन्सर बरा होतो



तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले; वाखरी येथे कॅन्सर निदान व्हॅनचे आगमन
पंढरपूर :   (कटुसत्य वृत्त):- कॅन्सर निदान व्हॅनच्या माध्यमातून कॅन्सर निदान व उपचार लवकर होण्यासाठी याचा फायदा होत आहे. सुसज्ज सुविधा गावापर्यंत या माध्यमातून पोहचत आहे. कॅन्सरचे लवकर निदान झाल्यास निश्चितच उपचाराने आजार पूर्णपणे बरे होतात, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग कर्करोग जनजागृती मोहीम अंतर्गत कॅन्सर निदान व्हॅनचे पंढरपूर तालुक्यात आगमन या निमित्ताने दि. ११ रोजी भाळवणी, दि. १२ रोजी उपरी, दि. १३ रोजी भंडीशेगाव येथे शिबिर आयोजित केले होते. दि. १४ रोजी वाखरी  येथे कॅन्सर निदान व्हॅनचे आगमन झाले. या शिबिराचे उद्घाटन आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.
एकनाथ बोधले, डॉ. भिसे, डॉ. स्वाती बोधले, डॉ. महेश माने, डॉ. प्रसन्न भातलवंडे, डॉ. खुपसुंगीकर, दंत शल्यचिकित्सक तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र गादेगाव व भाळवणी वैद्यकीय
अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर तसेच बहुसंख्येने स्त्रिया व पुरुष लाभार्थी उपस्थित होते. आतापर्यंत ४ गावांमध्ये ६०० च्यावर लाभार्थी यांची तपासणी केली आहे. संशयित असणारे मुख कर्करोग, गर्भाशय मुख कर्करोग व स्तन कर्करोग लाभार्थी यांची पुढील तपासणी
ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय यांच्यामार्फत होणार आहे. 
अंतिम निदान नंतर त्यांचे उपचाराचे  नियोजन करण्यात येणार आहे. यावेळी बोलताना आमदार समाधान अवताडे म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने चालू असणारा उपक्रम स्तुत्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
यांचा आरोग्याविषयी असणारा दृष्टिकोन अत्यंत प्रगल्भ आहे. या माध्यमातून नागरिकांना आरोग्य विषयक जनजागृती व तपासणी उपचार याचा फायदा होणार आहे. तरी जास्तीत जास्त लाभार्थी यांनी या उपक्रमाचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले.
हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्याकरिता आरोग्य सेवा पुणे उपसंचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा
आरोग्य अधिकारी सोलापूर डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्यचिकित्सक सोलापूर डॉ. वर्षा डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत
कुलकर्णी, सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. मोहन शेगर यांचे मार्गदर्शन लाभले.
चौकट 
महिलांच्या आरोग्याची होणार तपासणी
स्वस्थ नारी सशक्त परिवार अंतर्गत महिलांच्या आरोग्याची तपासणीही केली जाणार आहे. सदर शिबिरात रक्तदाब, मधुमेह तपासणी, रक्त लघवी तपासणीची सोय व्हॅनमध्ये करण्यात आले आहे. ही व्हॅन दि. १५ रोजी इसबावी, दि. १६ रोजी पंचायत समिती पंढरपूर, दि. १७ रोजी अजनसोंड, दि.
१८ रोजी सुस्ते, दि. १९ रोजी फुलचिंचोली येथे असणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages