Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार कल्याणशेट्टी बांधावर

 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार कल्याणशेट्टी बांधावर





अतिवृष्टीग्रस्त पिकांची पाहणी, पंचनाम्यांचे तातडीचे आदेश
कुंभारी, (कटुसत्य वृत्त):-  दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी, वळसंग, बोरामणी गटात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, कांदा, उडीद, तूर, भाजीपाला यासारख्या पिकांना पावसाचा फटका बसला असून अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विविध गावांना प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
या पाहणी दौयात आमदारांसोबत मंडल अधिकारी संतोष फुलारी, तलाठी समाधान काळे, ग्रामविकास अधिकारी प्रेमदास पवार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अण्णाराव बाराचारे, उपसरपंच राजशेखर कोरे, विजयकुमार शबाशे, माजी उपसरपंच सूरज पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवानंद  आंदोड़गी पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य सागर तेली, माजी सरपंच गेनसिद्ध भोरगुडे आप्पासाहेब गाडेकर, आप्पासाहेब वंटे, तसेच महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आमदार कल्याणशेट्टी यांनी शेतकऱ्यांचे दुःख ऐकून घेत प्रत्येक शेतकऱ्याचे नुकसान वेळेत नोंदवले गेले पाहिजे. पंचनामे तत्काळ पूर्ण करून मदत मिळावी, यास प्राधान्य असल्याचे सांगितले.
चौकट 
शेतकऱ्यांशी साधला संवाद
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी गावागावांतील शेतकन्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि त्याला संकटात एकटे सोडणार नाही, शेतकन्यांच्या हक्कासाठी विधानसमेत आणि शासनदरबारी ठामपणे आवाज उठवणार आहे, असल्याचे कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments