बार्शी तालुक्यातील पिकांचे मुसळधार पावसामुळे नुकसान
वाशी, (कटुसत्य वृत्त):- बार्शी तालुक्यात मुसळधार झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतात पाणी गेल्याने शेतकरी चिंतेत आहे.
शनिवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. दरम्यान, या पावसामुळे बार्शी
तालुक्यातील श्रीपत पिंपरी, जामगाव, तांदूळवाडी आदी गावात ओढे भरून बाहिल्याने वाहतूक बंद झाली.
तालुक्यातील तांदुळवाडी वासह खांडवी, भोवरे आदी गावात शेतात पाणी गेल्याने नुकताच पेरणी झालेल्या कांद्याचे बी वाहून गेले. तालुक्यातील तांदूळवाडी गावातील सागर गरड यांच्या कांद्याची पेरणी केलेल्या शेतातून मोठ्या पाण्यासह पीकही वाहून गेले. तालुक्यात कालच्या मोठ्या पावसाने काढणीस आलेला उडीद, सोयाबीन, कांदा पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. ऐन सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना या नुकसानीचा सामना करावा लागला आहे. रविवारी सुट्टी असल्याने सोमवारी याबाबत प्रशासनाने तत्काळनुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. शेतात पाणीच पाणी झाले असताना अनेक गावांचा संपर्क शहराशी तुटला आहे.
0 Comments