Hot Posts

6/recent/ticker-posts

१ हजार ८८१ भूमिहीनांना जागा : सीईओ जंगम

 १ हजार ८८१ भूमिहीनांना जागा : सीईओ जंगम




प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील कामगिरी
सोलापूर (कटुसत्य वृत्त) : प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात एक लाखांपेक्षा जास्त घरकुलांची कामे सुरू आहेत. त्यातील भूमिहीन लाभार्थ्यांसाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आतापर्यंत  १,८८१ भूमिहीनांना गावठाण, गायरान, खरेदीखत तसेच मयत वारसा हक्काने जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
सीईओ जंगम म्हणाले की, जिल्ह्यातील  ५,३५५ लाभार्थ्यांकडे जागा उपलब्ध नसल्याने घरकुल बांधकामात अडथळे येत होते. मात्र प्रशासनाने विविध उपाययोजना राबवून त्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे. काही ठिकाणी घरकुल बांधकाम संथगतीने सुरू असल्याने मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. येत्या १० ते १५ दिवसांत प्रगती दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सीईओ जंगम यांनी अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे आणि शिरवळ गावांना भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी ग्रामसभेत उपस्थित राहून नागरिकांना अभियानात सक्रिय सहभागाचे आवाहन केले.
याशिवाय,  तेलंगणातील विकासकामांचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यातील दहा जणांची टीम तेलंगणास भेट देणार आहे. या टीमचे नेतृत्व जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ करणार आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments