Hot Posts

6/recent/ticker-posts

फुलेंचा पुतळा अंधारात; सोलापूरकरांच्या संतापाची लाट

 फुलेंचा पुतळा अंधारात; सोलापूरकरांच्या संतापाची लाट

सोलापूर (कटूसत्य वृत्त) :– भारतीयांना व महिलांना शिक्षण देणारे, आद्य समाज सुधारक व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने अद्याप एक साधी लाइटही लावलेली नाही. हा प्रकार सोलापूरकरांसाठी लाजिरवाणा असून महात्मा फुले यांचा हा अपमानच असल्याची तीव्र भावना अॅड. राजन दीक्षित यांनी दैनिक कटूसत्य शी बोलताना व्यक्त केली.

एप्रिल महिन्यातच महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र माहिती अधिकारातून मागवलेल्या खर्चाच्या तपशीलाची माहिती देण्यात आलेली नाही. उपायुक्त मुलाणी यांनी छापील उत्तर देऊन जबाबदारी झटकली. तरीही आजपर्यंत पुतळ्याभोवती लाइट व सुशोभिकरणाची कोणतीही कामे करण्यात आलेली नाहीत.

याउलट, महापालिकेचे इंद्रभवन मात्र उजेडात न्हाऊन निघालेले आहे आणि समाज सुधारक महात्मा फुले अंधारात आहेत. हा प्रकार संतापजनक असल्याचे ओबीसी कार्यकर्त्यांनी सांगितले.

“महात्मा फुले यांचा अपमान सहन केला जाणार नाही. प्रशासनाने तातडीने पुतळ्याभोवती पुरेशी लाइट व सुशोभिकरणाची कामे करावीत, अन्यथा ओबीसी कार्यकर्त्यांना तीव्र आंदोलन उभारावे लागेल,” असा इशारा देण्यात आला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments