Hot Posts

6/recent/ticker-posts

पावसाने शेतीचे नुकसान झाल्याने वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

 पावसाने शेतीचे नुकसान झाल्याने वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

सोलापूर : :(कटूसत्य वृत्त):-   अतिपावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले, ते सहन न झाल्याने वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे घडली. चंद्रकांत
गुरूपदप्पा माळगे (वय ८०, रा. मुस्ती, ता. द. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाने उच्चांक गाठला आहे. अतिरिक्त पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. दक्षिण तालुक्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यामुळे तेथील शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. स्वतःच्या शेतात झालेले नुकसान पाहून वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन
जीवन संपवले. चंद्रकांत माळगे हे मुस्ती येथे शेती करतात. एक सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये वाशाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. नातेवाइकांनी त्यांना खाली उतरवून उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल कले परंतु, उपचारापूर्वी ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण जखमी अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण जखमी झाल्याची घटना बाळे ब्रिजजवळ घडली. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या वेळेस एक अनोळखी अनोळखी पुरुष वय अंदाजे ६० रस्त्यावरून चालत जात होता. त्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद
सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
पतीच्या मारहाणीत पत्नी जखमी
घरगुती भांडणातून पतीने मारहाण केल्याने पत्नी जखमी झाल्याची घटना शहरातील अंत्रोळीकर नगर येथे घडली. आदिती राजेश सीताफळे (वय ४०, रा. सुरवसे नगर, अंत्रोळीकर नगर जवळ, सोलापूर) यांना घरगुती कारणावरून पतीने मारहाण केली. त्यांच्या चेहऱ्यास जखम तसेच डोक्यास मार लागल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद
सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.
पैशाच्या कारणावरून चाकूने मारहाण
पैशाच्या कारणावरून एकास चाकूने मारहाण केल्याची घटना नई जिंदगी परिसरात घडली. रमीज जब्बार पटेल (वय ३८, रा. शोभादेवी नगर, नई जिंदगी) हा राहत्या घराजवळ थांबला असता पैशाच्या कारणावरून मोहम्मद जिलाणी शेख व इतर तीन ते चार जणांनी मिळून मारहाण करीत चाकूने वार केला. यामध्ये त्याच्या डाव्या हातास जखम झाली. उपचारासाठी त्याला शासकीय रुग्णालयात
दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.
विजेचा धक्का बसून महिला जखमी
पाणी भरल्यानंतर मोटार बंद करताना विजेचा धक्का लागून महिला जखमी झाली. ३० ऑगस्ट रोजी रात्री कुमठा नाका परिसात ही घटना घडली. नंदिनी भरतसिंग कजागवाले ( वय ३२, रा. भारत नगर, कुमठा नाका) ही पाणी भरून मोटारीचे बटण बंद करताना तिला विजेचा धक्का बसला. उपचारासाठी तिला गुरूनानक चौक येथील जिल्हा रुग्णा दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे.
चौकट 
घरगुती कारणावरून पत्नीवर चाकू हल्ला
घरगुती भांडणातून पत्नीला मारहाण करीत चाकूने हल्ला केल्याची घटना मोहोळ
तालुक्यातील मिरी येथे घडली. जयश्री विश्वनाथ पाटील (वय ४०, रा. मिरी, ता. मोहोळ)
यांना ३१ ऑगस्ट रोजी दुपारी राहत्या घरी पती विश्वनाथ पाटील याने मारहाण केली. चाकूने
वार केल्याने मानेवर आणि हातावर जखमी झाली. त्यांच्यावर कामती येथे उपचार करून
सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोद सिव्हिल पोलीस
चौकीत झाली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments