भाळवणीतून १ टन फरसाण, ३ टन केळी
भाळवणी (कटूसत्य वृत्त):- मुंबई येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला भाळवणी (ता. पंढरपूर) गावातील सकल मराठा समाजाने ठाम पाठिंबा दर्शविला आहे. समाजाच्या वतीने आंदोलनातील कार्यकर्त्यांसाठी १ टन फरसाण, ३ टन केळी आणि तब्बल २१०० पाण्याच्या बाटल्या पाठवून देत मोठी मदत करण्यात आली आहे. 'एक ध्यास माणुसकीचा, एक हात मदतीचा' या भावनेतून गावातील नागरिकांन स्वयंस्फूर्तीने निधी जमा करून ही मद उभी केली. सदर माल गावातील युवकांन स्वतः मुंबई गाठून आंदोलन ठिकाण जाऊन कार्यकर्त्यांमध्ये वाटप केला. मराठ आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्या गावोगावातून मदतीचा ओघ वाढत असून भाळवणीच्या योगदानामुळे समाजात उत्साह एकता आणि प्रेरणेचा संदेश पसरला आहे.
0 Comments