मराठा समाजाच्या मागण्यांसाठी वाखरीत लाक्षणिक उपोषण
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-
महाराष्ट्रातील मराठा नेत्यांच्या सर्व शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजाच्या मुलांसाठी २० टक्के
जागा राखीव ठेवाव्यात, मराठा समाजाच्या मुलांना शैक्षणिक सवलत मिळावी तसेच पंढरपूर येथे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उपलब्ध करावी या मागणीसाठी स्वप्निल सदाशिव देशमुख यांनी वाखरी (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीसमोर लाक्षणिक उपोषण केले.
मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा दर्शवित, समाजाच्या प्रगतीसाठी, आर्थिक विकासासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी यावेळी देशमुखयांनी केली. शासन स्तरावरील मागण्यांबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले असल्याबाबतचे पंढरपूर तहसीलदार यांचे पत्र भंडीशेगाव मंडल अधिकारी दिनेश भडंगे व तलाठी विक्रम पाटोळे यांनी सोमवारी सायंकाळी दिल्यानंतर देशमुख यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी पोलीस हवालदार गणेश इंगोले, अमर सुरवसे, शिवाजी मदने, अतुल गायकवाड, धनाजी पांढरे, उमेश पांढरे, चरण साळुंखे, अभिजीत शिंदे, सुभाष शिंदे, उत्तम यमगर, शिवाजी पांढरे आदी उपस्थित होते.
0 Comments